लातूर शहरात आणि जिल्ह्यात बोगस डॉक्टर जोमात प्रशासन मात्र कोमात !

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरात आणि जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टर पकडण्यासाठी एक समिती आहे. समितीवर जिल्ह्यातील मोठे अधिकारी आहेत पण कारवाई होताना मात्र दिसत नाही. यामुळे बोगस डॉक्टरांची हिम्मत वाढली आहे. आणि ते बिनधास्त रुग्ण तपासात आहेत. लातूर मनपा अधिकारी डॉ. प्रशांत माले यांना अधीक कार्यक्षम होण्याची गरज दिसत आहे. कारण लातूर शहरात बोगस डॉक्टर यांचे प्रमाण अधीक आहे.

राज्यतील  बोगस डॉक्टरांवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती सादर करण्याचे आदेश लोकायुक्त न्या. व्ही. एम. कानडे यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र  व पोलीस यांना दिले आहेत.या आदेशाची प्रत सर्व जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त यांना दिली आहे . जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त या सर्वांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टरांची माहिती पुढील सुनावणीला सादर करावी, असेही लोकायुक्तांनी आदेशात नमूद केले होते . यावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे .

मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मेडिकल कौन्सिल ऑफ ॲलोपॅथी यांच्याकडे अधिकृत नोंदणी नसलेले बोगस डॉक्टर हे समाजासाठी धोकादायक आहेत. झोपडपट्टी भागातच बोगस डॉक्टर अधिक असतात. अशा ठिकाणी बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचा मृत्यू होत असेल , अशी शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळेच बोगस डॉक्टरांची चौकशी होणे आवश्यक आहे, असेही लोकायुक्त न्या. कानडे यांनी आदेशात नमूद केले आहे.मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, मेडिकल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मेडिकल कौन्सिल ऑफ ॲलोपॅथी यांच्याकडे नोंदणी नसलेले अनेक बोगस डॉक्टर आहेत. अशा बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांची नाेंदणी रद्द करायला हवी.

Recent Posts