महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर कोर्टातील एका पोटगी प्रकरणात अँड. अजिंक्य चंद्रशेखर पारशेट्टी यांनी इतिहास रचला असे म्हणावे लागेल त्याला कारणहि तसेच आहे. सहसा पती पत्नी मध्ये घटस्फोट होतो आणि पत्नी पतीकडून आपल्या उदरनिर्वाह साठी पोटगीची मागणी करते आणि हि मागणी मान्यही होते. पण लातूर कोर्टातील एक पोटगी प्रकरणात कोर्टाने पत्नीला पोटगी नाकारली आहे. पती कडून कोर्टात बाजू मांडणारे अँड. अजिंक्य चंद्रशेखर पारशेट्टी यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. खरी परस्थिति लपवून खोटी माहिती देत पोटगी मागणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. पोटगीसाठी केलेला अर्ज मा.कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. स्वत: चे नावे शेतजमीन व प्लॉट असतानाही सत्य परस्थिती या प्रकरणात लपविण्यात आल्याचे पतीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले.
पिडीत पतीने पत्नी पासुन होणाऱ्या जाचास कंटाळून विवाह संबंध संपुष्टात आणून घटस्फोट मिळावा, यासाठी मा. कौटुंबिक न्यायालय, लातूर येथे धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात पत्नीने अंतरिम पोटगीचा अर्ज न्यायालयात सादर केला. स्वतःला कसलेही आर्थिक मिळकत नाही व स्वतःच्या नावावर कसल्याही प्रकारची मालमत्ता नाही, घर खर्चासाठी पैसे नाहीत. कोणतेही उत्पन्न नसल्याचे दाखवित स्वतः ची उपजीविका भागविण्यासाठी, दाव्याचा खर्च, वकिलांची फीस, प्रवासासाठी दरमहा 25 हजार रुपये मिळण्याची मागणी पत्नीने केली.
न्यायालयाने पती-पत्नीना स्वतः ची मालमत्ता व दायित्वचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. पत्नी च्या नावे शेत जमीन व प्लॉट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पत्नीने न्यायालयाची दिशाभूल करून खरी परिस्थिती लपवून कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचे पतीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पतीच्या बाजुने अँड. अजिंक्य चंद्रशेखर पारशेट्टी यांनी काम पाहिले व अँड. नरेश कुलकर्णी, अँड. शाम्भवी वज्जलवार, अँड. योगेश शिरसाट, अँड. सागर गुरमे यांनी
सहकार्य केले.