महाराष्ट्र

लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म या संस्थेकडून नेताजी सुभाष चंद्र बोस नोबल पीस अवार्ड – 2022 जाहीर

महाराष्ट्र खाकी – ( मुंबई ) – दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म या संस्थेकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार नेताजी सुभाष चंद्र बोस नोबल पीस अवार्ड 2022 लातूरचे माझी लोकप्रिय संसद रत्न प्रोफेसर डॉ. सुनील गायकवाड यांना जाहीर झाला आहे. तसे दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड चे संस्थापक अध्यक्ष कल्याणजी जाना यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे.

डॉ. सुनील गायकवाड हे 16 व्या लोकसभेत उच्च शिक्षित खासदार म्हणून हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. त्यांनी त्यांच्या लातूरच्या खासदारकीच्या काळात कुठलाही जातीय तणाव निर्माण होऊ दिला नाही. पाच वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसभा मतदारसंघात कसलाही ॲट्रॉसिटी चा गुन्हा सुद्धा दाखल झाला नव्हता. अशा प्रकारे जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघात त्यांनी सामाजिक सलोख्याचे वातावरण ठेवलेलं होतं. त्यांनी अनेक जनहिताचे कामे लोकसभा खासदार असताना मतदारसंघात केलेली आहेत.

या सर्व कामाची दखल घेऊन यापूर्वी त्यांना अनेक अवार्ड देश-विदेशात मिळाले आहेत, बांगला भारत समन्वय समितीकडून त्यांना जागतिक शांततेचा पुरस्कार ही मिळालेला आहे. दिल्ली येथे बुद्धा पिसा वार्ड मिळालेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवार्ड,लॉर्ड बुद्धा अवार्ड,संसद रत्न अवार्ड, असे अनेक अवार्ड त्यांच्या केलेल्या कामाबद्दल मिळालेले आहेत. विश्व दलित परिषद या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रोफेसर डॉ. सुनील गायकवाड यांनी देशभरात आपल्या संघटनेचे जाळे पसरवले आहे ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटना आहे.

समाजातल्या शेवटच्या घटकातील माणसांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे बनावट जातीचे प्रमाणपत्र घेऊन दलित किंवा मागासवर्गीय असल्याचे खोटे प्रमाणपत्र घेऊन जे रिझर्वेशन चा फायदा घेतात अशा नकली प्रमाणपत्र धारकांना शोधून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम ही संघटना करत असते .आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून दोन हजारपेक्षा जास्त बनावट जात प्रमाणपत्र घेऊन त्याचा फायदा घेतलेल्या लोकांवर एफआयआर दाखल केलेली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना 2022 चा नेताजी सुभाष चंद्र बोस पीस अवार्ड जाहीर झाला आहे.

दादासाहेब फाळके ऐकोन अवार्ड फिल्म या संस्थेने सुरू केलेल्या या अवार्ड चे पहिले मानकरी डॉक्टर सुनील गायकवाड हे झाले आहेत मुंबई येथे शानदार कार्यक्रमात 20 फेब्रुवारी 2022 रोजी द हॉलिडे इन हॉटेल साकीनाका अंधेरी मुंबई येथे सायंकाळी संपन्न होणार आहे
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना दिला जाणारा पुरस्कार चे पत्र कल्याणजी जाना, अंकिता जाना ,भेरू जैन यांनी पाठवले आहे. डॉ. सुनील गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विशेष कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे.

Most Popular

To Top