पोलीस

लातूर MIDC मधून चोरी गेलेले 548 कट्टे सोयाबीन लातूर LCB आणि MIDC पोलिसांनी 24 तासात मुद्देमालासह आरोपीना केली अटक

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न चांगल्या प्रकारे होते. आणि आयात निर्यात होत असते लातूर जिल्ह्यात अनेक मोठे व्यापारी सोयाबीन खरेदी करून आपल्या विश्वासू माणसांच्या जीवावर गोडाऊन मध्ये साठून ठेवत असतात पण याच विश्वासू माणसांकडून किंवा चोरांकडून साठवलेल्या सोयाबीनवर डल्ला मारला जातो, या गोष्टी टाळण्यासाठी पोलिस सतर्क असतात याच सतर्कतेने अशा अनेक चोरीच्या आणि दरोड्याच्या घटना लातूर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. असाच एक दरोडा LCB आणि MIDC पोलिस यांनी उघडकीस आणला आहे. दिनांक 01/02/2022 रोजी नवीन MIDC लातूर येथील एका गोडाऊन मधून 16.7 लाख रुपये किमतीचे 548 कट्टे सोयाबीन अज्ञात आरोपीनी दरोडा टाकून चोरी केल्याची घटना घडली होती.त्यावरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी DYSP जितेंद्र जगदाळे , औसा DYSP औसा मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अशोक बेले यांचे नेतृत्वात या गुन्ह्याच्या तपासासाठी  LCB , MIDC पोलीस स्टेशन व सायबर सेल चे अधिकारी/ अंमलदार यांचे स्वतंत्र 06 पथक तयार करण्यात आले होते.

हे पथक या गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत  असताना सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषण व LCB च्या पथकास गोपनीय माहिती वरून MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या सोयाबीन गोडाऊन वरील दरोड्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी 12 नंबर पाटी परिसरात आहे. अशी माहिती मिळाल्याने या पथकाने 12 नंबर पाटी परिसरातील गोपनीय माहिती मध्ये मिळालेल्या ठिकाणी छापा मारला आणि एक संशयित वेक्ती मिळून आला.त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव नूर इसाक सय्यद राहणार सुरतशाहवली दर्गा रोड,लातूर
असे असल्याचे सांगितले.

पोलिस पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दिनांक 01/02/2022 रोजी रात्री मी घरी असताना दोघेजण माझे घरी आले व सोयाबीनची गाडी भरायची आहे असे सांगून मला घेऊन गेले. दोन ट्रक मध्ये सोयाबीनचे कट्टे भरून ते दोन ट्रक पैकी एक ट्रक कृषीधन वेअर हाऊस, बाफना शोरूम च्या समोर नांदेड रोड येथे व दुसरा ट्रक मार्केट यार्ड मधील आडत व्यापारी गोपीनाथ खाडप यांचे दुकानाजवळ लावण्यात आले.तेथे हमालांचे मदतीने सोयाबीनचे कट्टे उतरून घेण्यात आले अशी माहिती दिली. त्यावरून आडत दुकानदार गोपीनाथ शेषराव खाडप यांचे कडून दरोड्यात चोरीस गेलेले 203 सोयाबीनचे कट्टे व गुन्ह्यात वापरलेला

ट्रक क्रमांक MH12 FC -7028 तसेच कृषीधन वेअर हाऊस चा मॅनेजर अजय सुग्रीव कांबळे याच्या कडून 345 सोयाबीनचे कट्टे व गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्रमांक MH 11 AL – 1885 असा एकूण 46 लाख 61 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून यातील मुख्य आरोपी 1)बालाजी कोयले  2) शिवगणेआप्पा व सोबतचे गुन्ह्यातील इतर साथीदार हे गुन्हा घडल्यापासून फरार असून पोलिस पथके त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास MIDC पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे करीत आहेत.

हि कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा,लातूर चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथका मधील सपोनि सुधीर सूर्यवंशी, सपोनि राहुल बहुरे,सपोउपनि संजय भोसले,पोलीस अमलदार- राम गवारे, सुधीर कोळसुरे,अंगद कोतवाड,बाळू डांगे, संपत फड,राजेंद्र टेकाळे रामहरी भोसले, गोविंद जाधव, सचिन मुंडे ,सिद्धेश्वर जाधव,बंटी गायकवाड, माधव बिल्लापट्टे, बालाजी जाधव, दिनेश देवकते, प्रमोद तरडे, विनोद चिलमे, रवी कानगुले, तुराब पठाण ,

नवनाथ हसबे,प्रकाश भोसले,पोलीस ठाणे एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील पथकातील सपोनि दिपाली गीते, पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड , पोलीस अमलदार संजय फुलारी, अर्जुन राजपूत, विकास नळेगावकर, सिद्धेश्वर मदने, मदार बोपले, कोडे, तुरे, बिराजदार, शिंदे, बुजारे ,जाधव ,ओगले तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अशोक बेले,सपोनि सुरज गायकवाड, पोलीस अमलदार प्रदीप स्वामी, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली.

Most Popular

To Top