‘माथेफिरू नाना पटोले’ ला येरवडा इस्पितळात दाखल करा ! त्याचा खर्च भारतीय जनता युवा मोर्चा करेल ! – भायूमो प्रदेश सचिव प्रेरणा होनराव

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. आणि या मुळे राज्यात भाजपा कडून निषेध व्यक्त होत आहे. लातूर मध्येही भाजप युवा मोर्चा कडून नाना पटोले यांच्या नावाची पाटी गाढवाला घालून चौकात धिंड काढण्यात आली.

यावेळी भा.यू.मो च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रेरणा होनराव म्हणाल्या की नाना पटोले या माथेफिरू माणसाला देशाच्या पंतप्रधाना बद्दल मोलण्याची तमा (पद्धत) नाही. अशा माथेफिरू माणसाला येरवडा वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे आणि होणारा सर्व खर्च भा. यू. मो करण्यास तयार आहे. असे प्रेरणा होनराव म्हणाल्या या आंदोलना वेळी भा. यू. मो लातूर जिल्हा अध्यक्ष आणि लातूर मनपा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, अँड. गणेश गोमचाळे, गजेंद्र बोकन, चिवडे पाटील आणि कार्यकर्ते उपस्तित होते.

 

 

Recent Posts