महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार डॉ सुनील गायकवाड साहेब यांना बदलून भाजपने खूप मोठी चूक केली सुनील गायकवाड यांच्या काळामध्ये केंद्राच्या ज्या काही योजना होत्या त्या योजनांची माहिती गटविकास अधिकारी असतील तहसीलदार असतील कृषी सेवक असेल ग्रामसेवक असे तलाटी असेल असतील सर्व पर्यंत व गाव पातळीपर्यंत माजी खासदार साहेब यांची डायरेक्ट लिंक होती त्यामुळे ग्रामीण भागातील लोकापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात योजनेचा लाभ कसा घेतील त्या हेतूने त्यांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी कार्य केले.
चालू खासदार साहेबा बद्दल आपण यांना कुठे पाहिलं का अशा भूमिकेमध्ये काम करणाऱ्या लोकांना जनतेने निवडून देऊन खूप मोठं जनतेची हानी झाली असून याकडे भाजपा मधील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देऊन चालू खासदारांच्या कार्य काळामध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा घ्यावा यामध्ये चालू खासदार साहेब झिरो आहेत या सर्व गोष्टी गांभीर्याने घेऊन येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जनते मध्ये काय ताकत असते ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही.
भारतीय जनता पार्टीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून निष्क्रिय माणसांना संधी देऊन खूप मोठं स्वतःआव्हान नेतेमंडळींनी उभा करून घेतला आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी मधील जीके गटबाजी आहे तू या गटाचा तो त्या गटाचा भाजपमधील कार्यकर्त्याकडून भारतीय जनता पार्टी ला बसणार आहे जुनं ते सोनं म्हणी प्रमाणे ग्रामीण भागातील मतदार आहे नक्कीच आपणास येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का बसणार हे आम जनतेचे मत आहे इंटरनेटच्या युगात जनता खूप हुशार झाली आहे पक्षांतर्गत वरिष्ठ मंडळी डाव पेच करत असतील तर त्या भूमिकेला सुद्धा तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी ही लातूर जिल्ह्यामध्ये कोठेही पहावयास मिळत नाही हुकूमशाही पद्धतीने चाललेला हा कारभार देवणीकर यांनी प्रत्यक्षात अनुभव घेऊन मतदानाच्या रुपाने जनतेने दिलेली भारतीय जनता पार्टीला दिलेली धोक्याची घंटा वरिष्ठांनी स्वीकारलीच पाहिजे त्याच पद्धतीने आपण हुकूमशाही पद्धत बंद करून एक स्वच्छ निर्मळ पारदर्शक कारभार भारतीय जनता पार्टीने लातूर जिल्ह्यामध्ये करणे अपेक्षित आहे भारतीय जनता पार्टी सुनील गायकवाड हा व्यक्ती कुणाच्याही हुकुमशाहीला थारा न देणारा व्यक्ती असल्यामुळे त्यांना काही हम बोले सो कायदा म्हणणारे नेते? त्यामुळे बदल केला असावा असं चित्र जिल्ह्यामध्ये तर आहे पण आम जनतेमध्ये याच गोष्टीची चर्चा आहे.