महाराष्ट्र खाकी ( सातारा ) – औषध (मेडिकल) दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेड्युल एच औषधे व स्टेरॉइडस् यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टराच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्टेरॉइडस, गर्भपातावरील औषधे ॲन्टीबायोटीक्स आदी औषधे रुग्णांच्या तोंडी मागणीवर विक्री केली जाऊ नयेत यासाठी औषध दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणीकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास अशा औषध दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त यांना दिले आहेत.