महाराष्ट्र

लातूर MIDC मधील हरीतपट्टे मनपा मार्फत विकसीत करावेत लातूर काँग्रेसच्या वतीने MIDC व मनपाकडे मागणी

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान राहिले आहे. लातूर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कारकर्ते यांनी विकासाची आणि लोककल्याणकारी मूमिका आणि दृष्ठिकोन सतत ठेवला आहे. वेळीवेळी जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या शासकीय विभागाणा नीवेदने देऊन विकास कामांची मागणी करत असतात.

अशीच एक मागणी लातूर काँग्रेस तर्फे लातूर MIDC आणि लातूर शहर महानगरपालिकेला केली आहे. लातूर मनपाचा विस्तार झाला आहे त्यामुळे MIDC चा भाग मनपात हद्दीत आला आहे त्यामुळे MIDC मधील हरीतपट्टे लातूर शहर महानगरपालीकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत हे हरीतपट्टे महापालीकेने योग्य पध्दतीने विकसीत करून शहराच्या विकासात आणि सौदर्य भर पडेल अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीला दोन्ही विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने MIDC कडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर MIDC साठी जमीन संपादीत केल्या नंतर प्लॉट पाडतांना नियमानुसार हरीतपट्टयासाठी खुल्या जागा सोडण्यात आल्या आहेत. अनेक वर्ष होवूनही या खुल्या जागा किंवा हरीतपट्टे व्यवस्थीत विकसीत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते हरीतपट्टे MIDC ने लातूर महानगरपालीकेकडे हस्तात्तरीत करावेत अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, महापालीकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते ॲड. दिपक सुळ, नगरसेवक विजय साबदे,नगरसेवक पुनीत पाटील यांच्या शिष्टमंडळाने MIDC प्रादेशिक अधिकारी श्री मेघमाळे यांना दिले. त्यांनी लातूर काँग्रेसच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या शिष्टमंडळाने त्यानंतर लातूर शहर महानगरपालीका अमन मित्तल यांचीही भेट घेऊन MIDC कडून हरीतपट्टे हस्तातरीत झाल्या नंतर ते नाविन्यपूर्ण पध्दतीने विकसीत करून शहराचे सौदर्य वाढवावे अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.MIDC तील हरीतपट्टे मनपाकडून विकसीत करण्यात येतील असे आश्वासन महानगरपालीका आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहे.

Most Popular

To Top