प्राध्यापक उमाकांत होनराव यांच्या मार्गदर्शनात श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयात वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्याच्या शैक्षणीक क्षेत्रात आपले आणि लातूरचे अढळ स्थान निर्माण करणारे श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, लातुर संस्थेचे अध्यक्ष श्री.उमाकांत होनराव सर यांनी वय वर्षे 15 -18 साठी लसीकरण मोहीमेस आपल्या संस्थेत सुरुवात केली. पंतप्रधान (PM Narendra Modi ) यांनी वय वर्षे 15 – 18 साठी लसीकरण मोहीम देशभरात सुरू केली आहे. राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लातुर जिल्ह्यामध्ये दिनांक 3 जानेवारी, 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे.

15 ते 18 वर्ष वयोगटामधील जिल्ह्याचे उद्धिष्ठ 1 लाख 34 हजार 314 असून, हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शाळा, कॉलेज लसीकरण अभियान राबवत आहेत.या लसीकरण अभियानाचा शुभारंभ आज आपल्या श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, लातुर संस्थेत लातूरचे माजी पालकमंत्री आमदार (Sambhaji Patil Nilangekar) आणि संस्थेचे अध्यक्ष श्री.उमाकांत होनराव सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लातूर मध्ये सर्वात प्रथम लसीकरण करण्याचा संस्थेला बहुमान मिळाला आहे.

सर्व पात्र लाभार्थी तरुण तरूणींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी केले. या लसीकरणाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सहा दिवसांमध्ये 2500 डोस असून पुढील टप्प्यात वेगाने लसीकरण करून घेण्यात येईल. या प्रसंगी श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, लातुर संस्थेचे कार्यकारी संचालक श्री.ओंकार होनराव, संस्थेच्या प्राचार्या सौ.सुलक्षणा केवळराम, सौ. शोभाताई पाटील, प्रेरणा होनराव, मनीष बंडेवार, शिरीषजी कुलकर्णी, प्रविणजी सावंत त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 6 हजार 939 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी एच.व्ही. वडगावे यांनी कळविले आहे.

 

 

 

Recent Posts