लातूररोड येथे दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने तिन घरावर दरोडा टाकला

महाराष्ट्र खाकी (चाकूर ) – लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील लातूररोड येथेल घरात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना दि.29/12/2021 वार बुधवार पहाटेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी शस्त्राची भीती दाखवून तीन घरे लुटली . सोने, चांदी आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाख 21 हजाराचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी अन्य दोन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक जागे झाल्याने तेथून ते पसार झाले.लातूर रोड येथील बाबूराव कलाल यांच्या घरी रात्री 1.05 मिनिटाला दरोडेखोरांनी मुख्य प्रवेशद्वार टामीच्या सह्याने तोडले. बाबूराव कलाल यांना चाहूल लागली. दरोडेखोर तेथून पळून गेले . तेथून लक्ष्मीकांत राठी यांच्या घरासमोर दबा देऊन बसले. घराचे मागचे दार तोडण्याचा प्रयत्न केला.

लक्ष्मीकांत राठी यांच्या पत्नी जागी झाल्याने त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा शेजारचे मधूकरराव मुंडे घराबाहेर आले. दरोडेखोरांनी दगडफेक केली. राजेश्वर पाटील यांच्या घरातील सोन्याची दागिने, रोख 26 हजार रुपये घेतले. दरोडेखोरांनी राजेश्वर पाटील यांच्या बेडरुममध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखविला.चार वर्षांच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून एक दरोडेखोर तेथेच थांबला.

राजेश्वर पाटील, त्यांची पत्नी, एका लहान मुलीस चाकूचा धाक दाखून दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावर नेले. तेथे राजकुमार लिंबुटे यांना हाक मारुन घराचे दार काढण्यास भाग पाडले.राजेश्वर पाटील यांच्या मागे शस्त्रधारी लोक पाहताच राजकुमार लिंबूटे यांनी दार बंद करण्याचा प्रयत्न केला तो असफल ठरला.राजकुमार लिंबूटे त्यांची पत्नी सर्वांना धाक दाखवून एका जागेवर गप्प बसण्यास भाग पाडले. त्यांना चाकूचा धाक दाखवून सोने,चांदीचे दागिणे व 96 हजार रुपये रोख असा एवज लंपास केला.

राजकुमार लिंबुटे यांना चाकूचा धाक दाखवून बस्वराज सगरे यांचे घराचे दार काढण्यास भाग पाडले. तेथून सोने,चांदीचे दागिने रोख 49 हजार रुपये लुटले. लक्षण धाकपाडे यांच्या छतावरुन घरात प्रवेश केला. टामीच्या सह्याने दार तोडले. हॉलमध्ये लक्ष्मण धाकपाडे यांचे वडील नारायण यांना काठीने मारहाण केली. दरोडेखोर आल्याची चाहूल लागल्याने लक्ष्मण धाकपाडे यांनी पोलिस स्टेशनला फोन केला. तेव्हा त्यांची पत्नी सोन्याचे दागिने लपवून ठेवत होती. खिडकीतून एक दरोडेखोर हा प्रकार पाहत होता. अखेर लक्ष्मण यांच्या खोलीचे दार तोडून दरोडेखोरांनी दागिने व रोख रक्कम 1 लाख 48 हजार असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकूर पोलिस करत आहेत.

Recent Posts