महाराष्ट्र खाकी (औसा) – औसा-लामजना राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली पाटीजवळ रात्री 8 च्या सुमारास दोन चारचाकी वाहनांचा भिषण आपघात झाला. या अपघातात तिघे ठार तर तीनजण गंभीर जखमी आहेत.जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री 8 च्या सुमारास MH 24 F 0959 या क्रमांकची काळीपिवळी जीप औशाहुन लामजन्याकडे भरगच्च प्रवासी घेवून जात होती. तर लामजन्याहुन औशाकडे अती वेगाने येणाऱ्या MH 30, AA 4809 या क्रमांकची बोलेरोची वाघोली पाटीजवळ धडक झाली. हा अपघात एवढा भिषण होता की, यात काळीपिवळी जीपचा चक्काचूर झाला तर बोलेरो 100-150 फुट लांब जावून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. यात दोघे जागीच ठार झाले तर एकाचा लातूरला नेत असताना मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
मृतांची अद्याप ओळख पटू शकली नाही. या अपघातात तिघे गंभीर जखमी असून 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्वांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी औसा पोलिसांनी पाहणी करून वाहतूक सुरळीत केली. तसेच DYSP पवार यांनीही अपघात स्थळी भेट दिली.