महाराष्ट्र खाकी ( वाराणसी ) – दिनांक 20/21 डिसेंबर रोजी भारताचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री यांच्या लोकसभा मतदार संघात उत्तर प्रदेश सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून श्री काशी विश्वनाथ धाम यात्रा कार्यक्रम अतर्गत सामाजिक समरसता संमेलन वाराणशी येथे घेण्यात आले. कार्यक्रम चे उद्घाटन उत्तर प्रदेश चे समाजकल्याण मंत्री श्री रमापती शास्त्री यांच्या सोबत अनेक मान्यवर च्या उपस्थितीत संपन्न झाला.
या शासकीय कार्यक्रमा साठी देशातून राज्याबाहेरील केवळ लातूर चे संसदरत्न, लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना या कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी विविध उदाहरण देऊन सामाजिक समरसतेचा अर्थ समजावून सांगितले, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना त्यांनी “सामाजिक समरसता” हे पुस्तक लिहून प्रकाशित केले आहेत. ते विकत घेऊन अवश्य वाचन्याचा सल्ला दिला.
सामाजिक समरसता चा संदेश स्वतःच्या संघटने पासून देण्याचा उपक्रम नुकताच केला आसल्याचे सांगताना म्हणाले की ” विश्व दलीत परिषद” ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये चालवतात त्या संघटनेत नुकतेच एका ब्राह्मण वकील महिला ॲड प्रणिता अद्वैत देशपांडे या नेदरलेंड च्या रहिवाशी असलेल्या आणि मूळ भारतीय असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योजक असलेल्याना विश्व दलीत परिषद च्या आंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून सामाजिक समरसता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न संघटनेने केल्याची माहिती दिली.
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जर भारतीय संविधान लिहल नसतं तर आज कुठला दलीत अदिवासी हिंदू च्या तीर्थ क्षेत्र असलेल्या (काशी) वाराणशी भूमीत येऊन आपले विचार मांडू शकला असता का असा प्रश्न ही उपस्थित केला.
पुढं डॉ गायकवाड म्हणाले की आपल्या देशातील विषमता संपवायचं असेल तर अस्पृश्य लोकांनी नाही तर सवर्ण, ब्राह्मण लोकांनी पुढाकार घेऊन “रोटी बेटी “व्यवहार पण लव मॅरेज नाही तर सोयरिक करून अंतर जातीय विवाह केला तर सामाजिक समरसता येईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमा साठी उत्तर प्रदेश मधून वेग वेगळ्या ठिकाण हून दलीत आदिवासी लोकांची विशेषतः महिलांची संख्या हजारों च्या संख्येनी होती.
या कार्यक्रमाला उत्तर परदेश सरकार चे कॅबिनेट समाज कल्याण मंत्री श्री रमापती शास्त्री,लातूर चे 16 व्या लोकसभा चे लोकप्रिय उच्च शिक्षित,संसदरत्न , विश्व दलीत परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. डॉ. सुनील बळीराम गायकवाड, समाज कल्याण चे डायरेक्टर आय ए एस राकेश कुमार, समाज कल्याण राज्यमंत्री संजीव गोंड, उत्तराखंड चे अनुसूचित जाती आयोग चे अध्यक्ष मुकेश कुमार, उत्तराखंड अनुसूचित जनजाती आयोग चे अध्यक्ष मुरतराम शर्मा, विश्व दलीत परिषद चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार, उत्तर प्रदेश अनुसूचित जाती जनजाती आयोग चे उपाध्यक्ष राम नरेश पासवान, दलीत चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की) चे दक्षिण भारत चे अध्यक्ष डॉ राजा नायक, अनुसूचित जाती जन जाती आयोग चे उपाध्यक्ष मिथिलेश कुमार, समाज कल्याण विभाग उत्तर प्रदेश चे मुख्य सचिव, वाराणशी चे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ जी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन झाला.