महाराष्ट्र खाकी (लातूर) – ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस हातपाय पसरताना दिसत आहे. देशात शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रात ओमिक्रॉन आपले हातपाय पसरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर यानंतर आता लातूरमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर करांना काळजी
आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विना मास्क घराबाहेर पडू नये, मनपाने लसीकरणाचे प्रमाण वाढवले आहे ज्यांनी लस घेतली नाही अशा नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन केले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत विक्रांत गोजमगुंडे यांचे कार्य उत्तम होते, व्हिडीओ मध्ये पाहू महापौर विक्रांत गोजमगुंडे काय म्हणाले