महाराष्ट्र खाकी (सातारा) – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खाजगी सचिवाच्या गाडीतून पैसे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाबासाहेब शिंदे यांच्या कारमधून 50 हजार रुपये आणि काही महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचा आरोप आहे.सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये लग्न सोहळ्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला.
बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. शिंदे लग्न सोहळ्यात उपस्थित राहून परत निघाल्यावर कारकडे येत असताना गाडीची काच फोडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिंदे यांनी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकरणी तक्रार दिली. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभुराज शिंदे हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गृहमंत्र्यांच्या खाजगी सचिवाच्या गाडीची काच फोडून पैशांची चोरी केली जाते, या प्रकारावरून चर्चा रंगली आहे.