लातूर LCB ची कामगिरी, चोरी गेलेल्या 11 मोटरसायकल, 03 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी उत्तम कामगिरी करत जिल्ह्यातील अवैद्या धंदे आटोक्यात आणले आहेत. काही दिवसापूर्वी लातूर शहरातील मटका, जुगार आड्यावर मोठी कारवाई करून मटका चालवणाऱ्यांच्या मानत धडकी भरवली आहे, गुटका, वेश्या व्यवसाय आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या सर्व कारवाईत लातूर LCB चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचा महत्वाचा सहभाग असतो. असाच एक गुन्हा उघडकीस आणि चोराला पकडण्यात LCB च्या पथकला यश आले आहे. लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .

या गाडी चोरीच्या गुन्ह्याबद्दल माहिती घेत असताना LCB च्या पथकाला माहिती मिळाली की, शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरी मधील एक्टिवा गाडी विकण्यासाठी एक वेक्ती सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील एका विश्रामगृह परिसरात येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने LCB पथक तात्काळ कुर्डूवाडी येथील विश्रामग्रह परिसरात पोचून तेथे सापळा लावला. थोड्याच वेळात बातमी प्रमाणे एक वेक्ती कळ्या रंगाच्या एक्टिवा गाडी वरून येत असताना दिसला. पथकातील पोलिसांनी त्या एक्टिवा गाडीच्या चालकास थांबून त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 1) रोहित सुभाष अलगुडे, वय 26 वर्ष, राहणार वडारवस्ती, खाडगाव रोड, लातूर. सध्या राहणार भैय्याचे रान, भीम नगर, कुर्डूवाडी जिल्हा सोलापूर. असे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या एक्टिवा गाडी संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची एक्टिवा गाडी काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखीन मोटरसायकली चोरी केल्याचे सांगून

सदरच्या चोरी केलेल्या मोटरसायकली तो सध्या राहत असलेल्या कुर्डूवाडी येथील घराच्या समोरील मोकळ्या जागेत ठेवलेल्या असल्याचे सांगितले. तसेच इतर दाखल असलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील 06 मोटारसायकली असे मिळून एकूण 11 मोटरसायकल किंमत 03 लाख 48 हजार रुपयेचा मुद्देमाल सदर इसमाकडून कडून हस्तगत करण्यात आला आहे. रोहित अलगुडे यास पोलीस ठाणे शिवाजी नगर येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 387/2021 कलम 379 भा द वि या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन पोलीस चे पोलीस अधिकारी अमलदार गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. हि कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार संजू भोसले, संपत फड ,चंद्रकांत डांगे ,बंटी गायकवाड, सिद्धेश्वर जाधव , प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.

ताब्यात घेतलेल्या गाड्या खालीलप्रमाणे

1). काळी रंगाची हिरो होंडा सीडी डॉन MH 24 K
6742

2). काळी ळाळ रंगाची बजाज कंपनीची पल्सर MH
24 BD 022

3). ळाल रंगाची होंडा कंपनीची शाईन MH -24 S
6844

4). काळी ळाळ रंगाची बजाज डिस्कवर MH 24 T
8600

5). काळी रंगाची हिरो स्प्लेंडर MH 14 AQ 5087

6). पांढरी रंगाची टीव्हीएस कंपनीची विगो MH 24 AD 2884

7). काळी रंगाची हिरो होंडा स्प्ळलेंडट MH 12 FE
2623

8). काळी रंगाची हिरो स्प्ळेंडर MH 24 BH 776
9). ग्रे रंगाची होंडा शाहन MH 44 P 9245

10). काळी लाल रंगाची होंडा ट्रीमयोगा

Recent Posts