सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात रेणापूर पोलिसांची जुगार अड्यावर मोठी कारवाई


महाराष्ट्र खाकी (रेणापूर) – लातूर जिल्ह्याला प्रथमच तिन IPS अधिकारी लाभले आहेत. त्यातील पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आपल्या कार्यातून लातूरकरांचे मने जिंकली आहेत. लातूर जिल्ह्यातील बरेच अवैद्य धंदे बंद केले आहेत. आता त्यांच्या सोबतीला अनुराग जैन आणि निकेतन कदम हे धाडसी आणि तरुण नव्या विचारांचे अधिकारी आले. त्यातील निकेतन कदम यांच्या कार्याची झलक लातूरकरांनी पहिली आहे. लातूर शहरातील गोलाईत गुटख्याचा मोठा साठा पकडून कडक कारवाई केली

आणि आता निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात रेणापूर तालुक्यातील पनगाव येथे जुगार अड्यावर कारवाई केली आहेत.लातूर पोलीस अधिक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांच्या गोपनिय माहितीवरुन व आदेशावरुन त्यांचे पथक आणि रेणापुर पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस यांनी दिनांक 18/11/2021 रोजी 18.30 वाजण्याचे सुमारास पानगाव शिवारात रमाकांत संपते यांचे शेतातील कोठयामध्ये तिर्रट जुगार खेळणा-यावर अचानक छापा टाकुन इसम नामे 1.लखन सुरेश बघीले वय 25 वर्ष रा.पानगाव

2.चंद्रकांत विलास पेददे, वय 30 वर्ष रा.पानगाव 3. महेश दगडु डोंगरे, वय 20 वर्ष रा.पानगाव 4. हुसेन
रसुल सय्यद, वय 70 वर्ष रा. मलिकपुरा परळी वै.जि.बीड 5.नरसिंग दिगंबर कांबळे, वय 21 वर्ष
रा.वालेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड 6.अविनाश प्रताप चिताडे, वय 25 वर्ष रा. नरवटवाडी
7.शिवकुमार सदाशिव छत्रबंद, वय 32 वर्ष रा. खाडगाव रोड लातूर 8.महादेव भिवाजी कलवले, वय 26
वर्ष रा. पानगाव 9.सुरज उत्तम हरिदास, वय 21 वर्ष रा. पानगाव

10.अशिष रामेश्वर पेददे , वय 22 वर्ष
रा. पानगाव 11.लक्ष्मण वैजनाथ पेददे , वय 31 वर्ष रा. पानगाव 12.वैभव शिवसिंग बायस, वय 21 वर्ष रा.
पानगाव 13. मंजुर पैगंबर शेख, वय 35 वर्ष रा. पानगाव 14. रमाकांत लिंबाजी संपते, वय 38 वर्ष रा.
पानगाव 15. भैय्या निवृत्ती आचार्य, वय 38 वर्ष रा. पानगाव 16. नरसिंग गोविंद जांभळे , वय 24 वर्ष रा.
नरवटवाडी 17. युवराज प्रल्हाद शिंदे , वय 40 वर्ष रा. मदने चौक, लातुर 18.मारुती केरबा कुरे , वय 39
वर्ष रा.पानगाव 19. बलभिम तुळशीराम हजारे, वय 45 वर्ष रा. पानगाव

20. ज्ञानोबा सोना जाधव, वय 45
वर्ष रा. सत्तारधरवाडी तांडा, ता.औसा 21. भागवत श्रीहरी वांगे, वय 52 वर्ष रा. पानगाव 22. गिरीष
बालाजी हानवते, वय 24 वर्ष रा. पानगाव 23. अनसर नाजोद्दीन शेख, वय 32 वर्ष रा.पानगाव 24.
निखील दत्ता वांगे, वय 24 वर्ष रा.पानगाव 25. इब्राहिम शेख रा.पानगाव यांना अटक करुन त्यांचे
ताब्यातुन एकुण 6,56,030/- रु. (अक्षरी सहा लाख छप्पन्न्‌ हजार तीस रुपये ) रुपयाचे मुद्देमाल मिळुन
आल्याने पो.स्टे. रेणापुर येथे गु.र.नं. 469/2021 कलम 12 (अ) मु.जु.का. प्रमाणे गुन्हा नोंद करुन
कारवाई करण्यात आली आहे.

Recent Posts