महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथील तसेच औसा येथील एसटी डेपो आंदोलन स्थळांस औसा चे आमदार अभिमन्यू पवार आणि नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले व एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्यात भक्कमपणे सहभागी असल्याचा विश्वास आंदोलनकर्त्यांना दिला. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे वेळेवर मिळावे, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी हजारो एसटी कर्मचारी राज्यभर आंदोलन करत आहेत. काही संघटनांना आश्वासन देऊन संप मिटला असेही जाहीर करण्यात आले पण अजूनही अनेक संघटना आणि हजारो कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. घरोघरो माताभगिनी दिवाळीच्या तयारीत, फराळ बनवण्यात व्यस्त आहेत पण एसटी महामंडळाच्या महिला कर्मचारी मात्र आंदोलन करत आहेत यावरून त्यांच्या तीव्र भावनांची दिसून येत होत्या . मागच्या 1-1.5 वर्षात 28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे पण असंवेदनशील सरकार त्यांना विश्वासात घ्यायचे सोडून उलट सेवा समाप्तीच्या नोटीस देत आहे. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विषय मार्गी लागायच्या ऐवजी आंदोलन हळूहळू चिघळत आहे. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीसाठी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सुद्धा बसत आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे आहे.
यावेळी सोबत श्री प्रदीप खंडापूरकर, नगरसेवक श्री अजित पाटील कव्हेकर, छत्रपती संभाजीराजे मंडळाचे अध्यक्ष श्री जोतिराम चिवडे, श्री रविशंकर केंद्रे, शहराध्यक्ष श्री लहू कांबळे, श्री ज्ञानेश्वर वाकडे, श्री शिवानंदजी हैबतपुरे, श्री सुनील उटगे, श्री नितीन पाटील, श्री जिलानी बागवान, श्री शिवरुद्र मुरगे, श्री धनराज परचने, श्री परमेश्वर बिराजदार, श्री विकास जाधव, श्री विकास कटके, श्री दत्ता पुंड, श्री मारुती पाटील, श्री मेनोद्दीन मोमीन, श्री प्रशांत येळनुरे, श्री बळवंत पाटील, श्री राठोड, श्री वामन मुळे, श्री सिद्धार्थ पाटील, श्री संतोष नायब, एसटी कर्मचारी, औसा तालुका व कासार सिरसी मंडळातील पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.