महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – पुणे आणि मुंबईतील बलात्काराच्या घटनानी संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला आहे. या मुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.यासाठी राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या कार्यालयात गृह विभागाची आढावा बैठक घेतली या बैठकीस राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील विविध पोलिस आयुक्तालयांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी या बैठकीस उपस्थित होते.
पण या परिस्थितीत दिड वर्षापासून महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे आठ वेळा प्रस्ताव जाऊनही महिला आयोगाचे अध्यक्षपद आजूनही रिक्त आहे. पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्ष नेमणुकीचा विषय या घटनेने चर्चेत आला आहे (Maharashtra Women Commission president post empty)
तत्कालीन अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा 4 फेब्रुवारी 2020 रोजी दिला. त्यानंतर आजूनही हे पद भरलेले नाही. बाब म्हणजे मागील तीन वर्षांपासून सुमारे महिला अत्याचारांची सुमारे चार हजार प्रकरणं आयोगासमोर प्रलंबित आहेत. सर्वात जास्त तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत.त्यानंतर बलात्कार, पतीकडून होणारी फसवणूक, हुंड्यासाठी छळ, कामाच्या ठिकाणी वाईट वागणूक, पगारात फसवणूक, महिला म्हणून होणारा भेदभाव, लैंगिक त्रास आणि प्रॉपर्टी मध्ये महिला असल्याने डावलणं अशा तक्रारींचे प्रमाण यात आहे. माजी अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर उच्च न्यायालयाने पुढच्या पंधरा दिवसात या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. पण तरीही हे पद भरले गेलेले नाही.
