रेणापूर जुना नाक्यावरील ब्लड बँकेच्या छतावरील होर्डिंगला चालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस क-हाळे येथील संदीप न्यानोबा क-हाळे या चालकाने लातुरातील अंबाजोगाई रोडवर एका ब्लड बॅकेच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे समोर आली आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, मयत संदीप न्यानोबा क-हाळे वय 26, राहणार डिग्रस क-हाळे ता. जि. हिंगोली. हा लातुर शहरातील अंबाजोगाई रोडवरील विश्व सुपर मार्केटच्या वर असलेल्या ब्लड बॅंकेतील एका नातेवाईकास भेटण्यासाठी आला होता . त्यांनी शनिवारी रात्री 12 ते रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ब्लड बॅकेच्या छतावर असलेल्या जाहिरात होर्डिंग लोखंडी फ्रेमला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली . या घटने बाबत नयन शंकरराव इंगोले वय 28, राहणार आनंद नगर लातूर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा गारोळे करीत आहेत.

Recent Posts