सरसकट देण्यात आलेल्या नोटीसांबाबत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहरातील मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने दिल्या गेलेल्या बांधकाम नियमितकरण नोटिसा, रुग्णालयांचे अडून राहिलेले प्रस्ताव आणि एकूणच नगर रचना विभागच्या कार्यप्रणाली विषयी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांनी मंगळवारी दि.31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नगररचना विभाग अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने नोटिसा दिल्याचे निष्पन्न झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल तसेच प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी दिला. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,विरोधी पक्षनेते ॲड.दीपक सूळ,ज्येष्ठ नगरसेवक रविशंकर जाधव, अहमद खान पठाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार विक्रांत गोजमगुंडे यांनी हातात घेतल्यापासून मनपाचा आणि नागरिकांच्या सुविधा मध्ये कमालीचा बदल दिसून येत आहे. नागरिकांना कुठल्याही समस्या येणार नाहीत आणि शहराचा विकास आणि उत्पन्न कसे वाढेल या गोष्टीना प्राधान्य देऊन कामे करण्याचे कौश्याल्य आणि दूरदृष्ठी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यात नागरिकांना दिसून येत आहे आणि शहरातील नागरिकात चर्चा ही दिसून येत आहे . शहराचा विकास करताना नागरिकांना त्रास होणार नाही या गोष्टीला प्राधान्य देणाऱ्या महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना मनपाच्या नगर रचना विभागा बद्दल नागरिकांकडून तक्रारी आल्यामुळे महापौर विक्रांत गोजमगुंडे नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले,शहरातील अनेक मालमत्ताधारकांना चुकीच्या पद्धतीने सरसकट नोटिसा दिल्याबाबत आलेल्या तक्रारींबद्दल महापौरांनी यावेळी विचारणा केली. बांधकामे नियमित करण्यासाठी नोटिसा देत असताना 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या बांधकामांनाही नोटिसा दिल्या गेल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले, याबाबत नाराजी व्यक्त करत अशा नोटिसा तात्काळ रद्द करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मालमत्ताधारकांना नोटीस देण्यापूर्वी महानगरपालिकेत संबंधिताचा असणारा बांधकाम परवाना पडताळून पहावा. त्यानंतरच नोटीस पाठवण्यात यावी तसेच शहरातील अनेक रुग्णालयांचे नर्सिंग परवाने प्रस्ताव प्रलंबित आहेत. अडून राहिलेले हे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, असे आदेशही त्यांनी दिले. कुठल्याही पद्धतीची कारवाई करत असताना सामान्य लातूरकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जावी. चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही यासाठी नियमांचे पालन करावे,असे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले. नगररचना विभागाच्या कारभारामुळे लातूर शहराची महानगरपालिके प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्येण्याच्या सूचना सर्वच पदाधिकाऱ्यांनी दिल्या. बैठकीदरम्यान सर्व पदाधिकारी आक्रमक झाल्याचे दिसून आले प्रमुख रस्त्यावरील बांधकामांना सरसकट नोटिसा देणे योग्य नसून अनधिकृत बांधकाम झाले असल्यास त्याचा बांधकाम परवाना तपासून केवळ जास्तीच्या अथवा अवैध बांधकामा बाबत नोटीस द्यावी याबाबत कोणाचाही आक्षेप नसून शहरातील रुग्णालयांच्या बाबतीतही असेच सरसकट कारवाई केली गेल्याचे दिसून येत आहे हे अत्यंत चुकीचे असून येत्या आठ दिवसांमध्ये सर्व प्रकरणांचे परिपूर्ण तपासणी करून त्यानंतरच पुढील कारवाई पारदर्शकपणे करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यापुढील काळात नागरिकांना विनाकारण नोटीस देऊन नाहक त्रास दिल्याचे निष्पन्न झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी बैठकी दरम्यान दिला. उपायुक्त मयुरा शिंदेकर,नगर रचनाकार विजय चव्हाण,क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी, पांडुरंग किसवे,कलीम शेख, संजय कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Recent Posts