अंबाजोगाई रोडवरील पुरुषोत्तम सुपर मार्केट समोर भर रस्त्यात पाईप लाईन फुटून पाण्याचा फवारा आणि हजारो लिटर पाणी वाया गेले

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर देशात ओळखल जात दोन कारणासाठी एक म्हणजे शिक्षणात लातूर पॅटर्न आणि दुसर म्हणजे लातूरला रेल्वेने पाणी आणले होते या दोन गोष्टीसाठी साठी. लातूरच्या पाण्याच्या प्रश्नावर लातूरचे राजकारण जास्त चालत अस म्हणतात. लातूरला पाण्याची अडचण ही सतत जाणवते पण लातूर महानगरपालिका पाण्याचे नियोजन वेवस्तीत करत आहे. पण याला छेड देणारी गोष्ट लातूर मधील अंबाजोगाई रोडवरील पुरुषोत्तम सुपर समोर भर रस्त्यात पाण्याची पाईप लाईन फुटली आहे आणि पाण्याचा फवारा झाला आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की पाण्याची मुख्य पाईपलाईन रोडच्या साईडला आहे म्हणजे आंबा अंबाहनुमान मंदिराच्या बाजूने सरळ शहरात गेली आहे. मुख्य पाईपलाईन नवीन रेणापूर नका येथील जलकुंभ मधून आली असावी . तर हा पाण्याचा फवारा भर रस्त्यात कुठल्या आणि कोणाच्या कनेक्शनचा आहे ? मुख्य पाईप लाईन पासून कनेक्शन देता येते का ? हे कनेक्शन कोणाचे आहे ? ज्याचे आहे त्यांनी मनापाला याविषयी माहिती दिली आहे का ? दिली असेल तर मनपा कारवाई किंवा दुरुस्ती का केली नाही ? हे फुटलेली पाईप लाईन आणि वाहून जाणारे पाणी पाहून आजू बाजूचे दुकानदार आणि नागरिक अशी चर्च्या करत आहेत की ही पाईपलाईन चोरून घेतली आहे! या कनेक्शन ची माहिती मनपाला माहीत काही अशा चर्च्या होत आहेत. मनपा प्रशासनाने या विषयी खुलासा करावा अशे नागरिकांचे म्हणणे आहे.

Recent Posts