केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडेंची घेतली भेट

महाराष्ट्र खाकी ( नवी दिल्ली ) – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, ती चर्चा फोल ठरली. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं डॉ. भागवत कराड यांना संधी दिली. या सर्व घडामोडींमुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून यावर थेट भाष्य करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांना संपवण्यासाठी वंजारी समाजातून भागवत कराड यांना मंत्रिपद दिलं गेलं आहे, अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. पंकजा किंवा प्रीतम मुंडे म्हणजे वंजारी समाज नाही. वंजारी समाजातून कोणीही नेता मोठा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबाच आहे. शिवाय, मंत्रिपद मिळालेले हे मुंडे साहेबांनी घडवलेलेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांचा आम्हाला अभिमानच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पण मुंडे समर्थक यांनी राजीनामे देऊन आपली नाराजी वेक्त केली. बिड, अहमदनगर याठिकाणच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती 70 च्या वर सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. पण पंकजा मुंडे नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेल्यावर त्यांची डॉ.भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोघांनीही तासभर गप्पा मारल्या. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ.भागवत कराड यांनी ट्विट करत या भेटीची माहिती दिली.

गोपीनाथ मुंडे माझे नेते होते, आज ताई आहेत… त्यांनीही साहेबांच्याप्रमाणे शुभेच्छा दिल्या. असं भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.”

Recent Posts