महाराष्ट्र खाकी (पुणे) – 23 जून 1946 रोजी पायाभरणी झालेल्या आणि राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या पुणे जिल्ह्यातील जनतेची आरोग्य सेवा करणाऱ्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आयोजित केला होता. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या महाविद्यालयास अद्यावत सुविधा पुरवण्यात येतील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. येथे शिक्षण घेऊन निष्णात डॉक्टर्स आणि नर्स तयार होतील व त्यांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याप्रसंगी शुभेच्छाही दिल्या . या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख , आमदार चेतन तुपे, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, यशदाचे महासंचालक तथा ससून रुग्णालयाचे समन्वयक एस. चोक्कलिंगम,
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख असे म्हणाले की , बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला गौरवशाली इतिहास आहे. कोरोना संकटातही बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने आपला गौरवशाली इतिहास कायम ठेवला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम तत्पर असतात, कोरोना काळात त्यांनी आपल्या विभागाला निधी कमी पडू दिला नाही, त्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीउपमुख्यमंत्री अजित पावसार यांचे आभार मानले.