लातूर जिल्हा

लातूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनात चालणाऱ्या अटल अन्नसेवेचे अविरत 35 दिवस

महाराष्ट्र खाकी (लातूर) – भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकन आणि त्यांच्या टिमच्या प्रेरणादायी कार्याची चर्चा पूर्ण जिल्ह्यात होत आहे. ग्राउंड लेवलला काम करून जनसेवा करणारे गजेंद्र बोकन यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. कारण अन्न दान बऱ्याच जणांनी केले पण शोबाजीही केली. अजित पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनात गजेंद्र बोकन यांनी केलेल्या कार्याची दाखल सर्वांनी घेतली आहे. जेवण सर्वांनी दिले पण पोषक जेवण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे लातूर अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर आणि उपाध्यक्ष गजेंद्र बोकन यांनी दिले असे रुग्णांनाचे नातेवाईक म्हणत आहेत आणि जिल्ह्यात यांची चर्चा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांचे आणि रुग्णांनचे खूप हाल झाले. ज्यास्त त्रास रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल झाले कारण सर्व बंद असल्यामुळे बाहेर जेवणाची सोय होणे अवघड होते. ही अडचण लातूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकरआणि उपाध्यक्ष गजेंद्र बोकन यांनी लक्षात घेऊन रुणांच्या तावाईकांसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंतर्गत कै. नागनाथ आण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ ‘अटल अन्नसेवा’चालू केली. आणि हजारो लोकांना पोषक जेवणाचे डब्बे पुरवले.दि 9/6/2021 बुधवार रोजी 35 दिवस यशस्वी वाटचाल करत पुर्ण झाली.

ह्या अन्न सेवेचे उद्दीष्ट असे होते कि लॉकडाऊन काळात रूग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची सोय होत नव्हती कारण हॉटेल, उडपी, रेस्टॉरंट हे सर्व बंद होते त्या मुळे रूग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची खुप अडचण होत होती हे पाहता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी अन्न सेवा देण्याचे ठरवले व त्यांच्या माध्यमातून 11,000 टिफिन(डब्बे) हे गोरगरीब रूग्णांच्या नातेवाईकांना पोहोचले. हि अन्नसेवा अशाच प्रकारे चालू ठेवली असती परंतू आता सर्व दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट अनलॉक झाले आहेत. यामुळे सर्व गोष्टी रूग्णांच्या नातेवाईकांना सहज उपलब्ध होत आहेत.तरी आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या जी काही मदत केली त्या साठी आपले खुप खुप आभार तसेच अन्नसेवेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकन, सरचिटणीस गणेश गोजमगुंडे,सागर घोडके,शंभूराजे पवार, आकाश बजाज,राजेश पवार चिटणीस दुर्गेश चव्हाण,गोविंद सुर्यवंशी,अजय कोटलवार,गणेश पवार,चंद्रशेखर पाटील,काका चौगुले,प्रेम मोहिते,रवी लवटे, पंकज देशपांडे,महादेव पिटले,राजश्री होणाळे,संतोष तिवारी,आकाश पिटले,नवनाथ ढेकरे,व्यंकटेश हंगरगे,उमेश इरपे,पृथ्वीराज कूरे,राहूल बिराजदार,योगेश गंगणे, संकेत गवळी,विश्वजीत पाटील,विकास डुरे,यशवंत कदम,आकाश जाधव तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी यांनी खुप परीश्रम घेतले.

Most Popular

To Top