लातूर मध्ये पेट्रोल -डिझेल दर वाढीविरुद्ध ऑड. दिपक सूळ यांचे आंदोलन.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या सूचनेनुसार पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात लातूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बार्शी रोडवरील उषाकिरण पेट्रोल पंप येथे लातूर महानगरपालिका विरोधी पक्ष नेते ऑड. दिपक सूळ यांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकार यांनी सर्वसामान्य जनतेची उघड लूट केली आहे. यावेळी उपस्थित काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ऑड.

दिपक सूळ यांनी माध्यमाशी बोलताना मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.ऑड. दिपक सूळ हे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या जवळचे आणि विश्वासू आहेत. जिल्ह्यातुन काँग्रेसचा आक्रमक आणि अभ्यासू नेता आहेत. लातूर महानगरपालिकेचे महापौर असताना ऑड. दिपक सूळ यांनी खूप कमि काळात चांगले काम त्यानी केले होते. लातूर शहरातील नाना – नाणी पार्कला लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नामकरण आणि स्वागत कामानिवर नाव टाकून घेतले. हे काम ऑड. दिपक सूळ यांनी खूप कमी काळात करून घेतले होते या कामामुळे अमित देशमुख ऑड. दिपक सूळ यांच्यावर खूप खुश झाले होते अशी त्या वेळेस चर्चा होती.

Recent Posts