लातूर LCB, मुरुड आणि गातेगाव पोलिसांची संयुक्त कामगिरी, तिन घरफोडीच्या गुन्ह्याची उकल.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख उतरताना दिसत आहे. कारण लातूर पोलिसांची धुरा IPS निखिल पिंगळे यांनी सांभाळल्या पासून लातूर पोलीस दलातील वेगवेगळी पथके कारवाई करण्यात एकदम तरबेज झाली आहेत. मग ते LCB चे पथक असो वा DYSP ऑफिसचे पथक असो प्रत्येक पथकाने आपली जबाबदारी वेवस्तीत पूर्ण करताना दिसत आहेत. आणि त्याचा रिजल्ट ही जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. असाच एक गुन्हा उघडकीस आणला आहे.पोलीस स्टेशन गातेगाव हद्दीमध्ये घडलेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्या करिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव DYSP औसा राजीव नवले यांचे मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे गातेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांच्या नेतृत्वात पथके तयार करण्यात आले होते. पोलीस स्टेशन गातेगाव हद्दीमध्ये घडलेल्या दोन चोरीच्या घटनांचा तपास करीत असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी बप्पा श्रीपती काळे, वय 50 वर्ष, रा. पळसप पारधी पिढी, ता.जी. उस्मानाबाद. यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने इतर साथीदाराच्या मार्फत पोलीस ठाणे गातेगाव हद्दीमध्ये दोन घरफोड्या तसेच पोलीस ठाणे पांगरी, जिल्हा उस्मानाबाद येथे एक घरफोडी करून माल चोरला आहे असे सांगितले.

आरोपीकडून घरफोड्या मध्ये चोरी केलेला माल खालील प्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे.

1) पोलीस ठाणे गातेगाव 77/2021 कलम. 461,380 भादवि मध्ये एकूण 14,900 रुपयाचा किराणामाल.

2) पोलीस ठाणे गातेगाव गुरनं 76/2021 कलम. 457,380 भादवि मध्ये ज्वारीचे एकूण चार कट्टे किंमत 6000/- रुपये.

3) पोलीस ठाणे पांगरी, जिल्हा उस्मानाबाद गुरनं 106/2021 कलम. 461, 380 भादवि मध्ये 17 सोयाबीन बियाण्याचे बॅग किंमत 61,580/-
असा एकूण 82,490/- रुपयाचा मुद्देमाल नमूद आरोपीचे ताब्यातून जप्त करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक,गातेगाव विलास नवले, पालघर पोलीस निरीक्षक मुरुड श्री डोने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे ,राम हरी भोसले ,प्रकाश भोसले, भीष्मानंद साखरे ,प्रमोद तरडे ,नागनाथ जांभळे, पोलीस ठाणे गातेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे ,पोलीस अंमलदार जीवन राजगीरकर ,पांडुरंग दाडगे, मदन मुळे ,विनोद गोमारे, पोलीस स्टेशन मुरुड येथील पोलीस अंमलदार रतन शेख, अतुल पतंगे, सुधीर साळुंके, यांनी पार पाडली.

Recent Posts