महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर पोलीस दलाची धुरा IPS निखिल पिंगळे यांनी सांभाळ्यापासून लातूर पोलीस मध्ये कमालीचे बदल आणि पोलीस जवानांचा आत्मविश्वास दिसून येत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत पोलिसांची आणि त्त्यांच्या परिवाराची काळजी आणि समस्या समजून घेऊन त्यानां मदत करणे. आणि कायदा सुवेवस्था पाळने या सर्व गोष्टींमुळे जवानांचे मन जिंकणारे एकमेव लातूर पोलीस अधीक्षक IPS अधिकारी म्हणजे निखिल पिंगळे
पोलीस जवानांना कर्तव्यसोबत त्यांच्या अडचणी, समस्या वयक्तिकरित्या स्वतः समजून घेऊन त्याचे निरासन करणे हा यांचा एक दैविक गुण आहे. कोरोनाच्या काळात प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह पोलीस जवानांची वयक्तिकरित्या कॉल करून विचारपूस करून त्यांच्या घरील अडचणी विचारून जवानांना बेड आणि योग्य उपचार मिळवून देण्यासाठी दिवसरात्र धडपड करणे असे यांचे अनेक कामे आहेत.
पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक फिटनेस साठी त्यांचा सारखाच प्रयत्न असतो. कामात नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून समाज गुन्हेमुक्त करण्यासाठी पोलीस जवानांना प्रोत्साहन देत असतात.
निखिल पिंगळे यांनी या लॉकडाऊन मध्ये स्वतः रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी केली आणि आढावा घेणारे हे पहिले पोलीस अधिकारी आहेत. जिल्ह्यातील बेकायदा चालणारे सर्व धंदे जवळपास बंद झाले आहेत असे लोक म्हणत आहेत. जिल्ह्यात 23 पोलीस स्टेशन,109 अधिकारी 1835 पोलीस जवान (कर्मचारी) IPS निखिल पिंगळे यांच्या अधिकारात काम करत आहेत. सर्व पोलीस जवानांच्या आणि जनतेच्या मनावर राज करणारे एकमेव पोलीस अधिकारी IPS निखिल पिंगळे आहेत.