लातूर जिल्हा

विलासराव देशमुख यांच्या जयंतीदीनी , सामुहिक आदरांजली कार्यक्रम होणार नाही.

महाराष्ट्र खाकी (लातूर) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या 76 वी जयंतीदिनानिमीत्त दरवर्षी 26 मे रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे होणारा सामुहिक आदरांजलीचा कार्यक्रम यावर्षीही कोविड 19आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर होणार नसल्याचे देशमुख कुंटूबियाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनानिमीत्त दरवर्षी 26 मे रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे सामुहिक आदरांजलीचा कार्यक्रम नियमीतपणे आयोजित केला जात असतो, त्या ठिकाणी लातूर जिल्हयासह राज्य आणि देशभरातील अनेक मान्यवर आणि सामान्य नागरीक येऊन आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण करीत असतात. यावर्षी सध्या संपूर्ण जगावरच कोविड 19 चे संकट कोसळले आहे. या कोविड 19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदया राज्य आणि देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सामाजिक, वैयक्तिक आंतर पाळून या विषाणुचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे एकत्रित लोक जमा होण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत. सदरील परिस्थीती लक्षात घेता आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या 76 वी जयंतीदिनी बाभळगाव येथे बुधवार दि. 26 मे 2021 रोजी सामुदायीक आदरांजली कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भाने देशमुख कुटुंबियाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली असुन सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्यांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Most Popular

To Top