पोलीस

Police,आत्महत्या करणाऱ्या आमदाराच्या पत्नीचे प्राण मुबंई वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले.

महाराष्ट्र खाकी (मुबंई) – मुबंई पोलीस आणि त्याची कार्य करण्याची पद्धत सर्वांनाच माहिती आहे. जगातल्या टॉप पोलिसांमध्ये मुबंई पोलिसांचे नाव घेतले जाते. कुठल्याही परिस्थितीत आपले कार्य करणाऱ्या अशाच एका मुंबई वाहतूक पोलीस अंमलदाराने दि.22/05/2021 शनिवारी सकाळी एका महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलं होत. चौकशी केली असता ही महिला आमदाराची पत्नी असल्याची माहिती समोर आली. TOI च्या वृत्तानुसार, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मानखुर्द पोलीस वाहतुकीचं नियोजन करत असताना एका गाडी चालकाने महिला पुलावर चढली आणि ती रडत असल्याची माहिती दिली. नंतर पोलीस अंमलदार ढगे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आलं. दरम्यान यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुम, मानखुर्द पोलीस स्टेशन आणि नवी मुंबई पोलिसांना घटनेची सर्व माहिती दिली. पोलीस अंमलदार ढगे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महिलेसोबत चर्चा करुन त्यांना खाली उतरवत आत्महत्येपासून परावृत्त केल आणि नंतर महिलेला मानखुर्द पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले . त्या महिलेने आपण आमदाराची पत्नी असल्याचे सांगितले . पारिवारिक वादामुळे आपण तणावात होतो असंही यावेळी त्या महिलेने सांगितले. महिलेला नंतर नवी मुंबई पोलिसांकडे सोपण्यात आलं, त्यानी परिवाराशी संपर्क करून घटनेची सर्व माहिती सांगितली.

Most Popular

To Top