देश

“तेहलका” चे संपादक तरुण तेजपाल यांची गोवा सत्र न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

महाराष्ट्र खाकी (गोवा) – तेजपाल यांनी शोधपत्रकारिता करून अनेक ढोंगी लोक, बड्या राजकीय नेत्यांचे खरे चेहरे जगासमोर आणले. गुजरात मधील हिंसाचार, पूर्वोत्तर भागातील पोलीस एन्काऊंटर, कोळसा आणि 2 G घोटाळा, इशरत जहाँ आणि तुलसी प्रजापती खून खटले, बेस्ट बेकरी खटला, भारत- दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅच फिक्सिंग 2000, संरक्षण दलातील भ्रष्टाचार (ऑपरेशन वेस्ट एन्ड), यासह दलित, आदिवासी, गोरगरीब जनता आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नाला वाचा फोडली. विकासाच्या नावाखाली होणारे सर्वसामान्यांचे शोषण पत्रकारितेतून दाखवून दिले. पीडितांना न्याय देण्यासाठी आणि सत्याचा शोध घेण्यासाठी तेजपाल यांच्या नेतृत्वाखाली तेहलका च्या सर्व टीम ने जोखीम पत्कारात लेखणी झिजवली. मागील सुमारे 35 ते 40 वर्षे हा माणूस पत्रकारिता जगला आणि सत्याची चाड असल्याने अनेकांचा हितशत्रू झाला होता. आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर तेजपाल 2013 मध्ये गोव्यात या प्रकरणात अडकले.


हा खटला 8 वर्षे चालला. तेजपाल यांच्या पाठीशी त्यांची पत्नी, मुले खंबीरपणे उभे राहिले. चौकशी आणि तपासाच्या नावाखाली विविध यंत्रणेकडून होईल तेवढा त्रास त्यांना देण्यात आला. या प्रकरणात गोवा पोलिसांनी दिवस रात्र एक करून तपास केला आणि वेचुन- वेचून पुरावे गोळा करीत तब्बल 2 हजार 684 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी साक्ष आणि सर्व पुरावे पडताळून पाहत अखेर तेजपाल याना निर्दोष मुक्त केले आहे. “सत्याच्या मार्गावर चालणे एवढे सोपे नाही त्यासाठी प्रचंड धैर्य लागते”

Most Popular

To Top