लातूर जिल्हा

इंटर्न डॉ. राहूल पवार यांच्या मदतीसाठी वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सरसवले.

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – औरंगाबाद येथील एमजीएम रूग्णालयात उपचार घेत असलेले इंटर्न डॉ. राहूल पवार यांच्या वर कोरोनाचे उपचार चालू आहेत. घरची हलकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांच्याच वर्गमित्रांनी आणि समाज माध्यमावर मदतीचे आवाहन केले होते. लोकांनी मदत ही केली आता वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी डॉ. राहूल पवार यांच्या प्रकृती विषयी तसेच त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारा संबंधी आज शुक्रवार दि. 21 मे रोजी वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी माहीती करून घेतली. या उपचाराच्या संदर्भाने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे एमजीएम रूग्णालय प्रशासनाला सांगितले असून तसे निर्देशही वैदयकीय शिक्षण विभागाला दिले आहेत. डॉ. राहूल पवार यांच्यावरील उपचार आणि त्यांच्या आईवडीलांच्या आर्थिक परिस्थिती विषयी आज वृतपत्रातून माहिती प्रसिध्द झाली त्याची तातडीने दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातून एमजीएम रूग्णालयाशी संपर्क साधून डॉ. राहूल यांची प्रकृती तसेच त्यांच्यावरील उपचाराविषयी माहिती घेतली. एमआयएमएसआर वैदयकीय महाविदयालय, एमजीएम रूग्णालय तसेच इतर काही मंडळी डॉ. राहूल पवार यांच्या वरील उपचारासाठी मदत करीत आहेत. आणि आता वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैदयकीय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ.चंदनवाले यांना एमजीएम रूग्णालयाच्या संपर्कात राहून डॉ. राहूल पवार यांच्यावरील उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच बरोबर डॉ. राहूल पवार यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल व ते लवकर वैदयकीय सेवेत रूजू होतील अशी सदभावना वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Most Popular

To Top