निलंगा येथील जुन्या पोलीस स्टेशन इमारतीमधील चोरीच्या आरोपीस पोलीसांनी केली काही तासातच अटक


महाराष्ट्र खाकी (निलंगा) – लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील जुन्या पोलीस स्टेशन इमारतीमध्ये चोरी झाली होती. यामुळे लातूर पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्तित निर्माण झाला होत. पण लातूर पोलिसांनी काही वेळातच आरोपीला तात्काळ अटक केली आहे.याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,दि. 16/05/2021 रोजी 16.00 वाजता . पोलीस ठाणे निंलगा येथील जुनी इमारत परीसरातील मुद्येमाल कक्षात चोरी झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळाल्याने पो.स्टे निलंगा येथील सपोनि सावंत, पोउपनि क्षिरसागर, बिट अंमलदार पोह/858 नागटिळक व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होवुन जुने पोलीस स्टेशन इमारतीतील घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाची (मुद्येमाल कक्ष) पाहणी केली असता मुद्येमाल कक्षाचा दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करुन मुद्येमाल कक्षातील एक देशी दारु खपटी बॉक्स आतमध्ये 48 बाटल्या कि.अ. 2496/- रु. चा मुद्येमाल चोरीस गेल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले.त्यावरुन पो.स्टे. निलंगा येथे बिट अंमलदार पोह/858 नागटिळक यांचे फिर्याद वरुन FIR 128/2021 कलम 454,457,380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाचे अनुषंगाने आरोपी व मुद्येमाल शोध घेण्यासाठी पो.स्टे.चे मनुष्यबळातुन अधिकारी व अंमलदार यांचे खास पथक तयार करुन रवाना केले असता आरोपी शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी तपासाची चक्रे फिरवुन गोपनिय माहीती काढुन सदर माहीतीच्या आधारे गुन्हयातील आरोपी  अकबर उर्फ टायगर फत्ते अहमद शेख रा. काझी गल्ली याने पोलीस ठाणे निलंगा चे मोहरील हे आजाराने त्रस्त असल्याचा गैरफायदा घेऊन नमूद आरोपीने सदरचा गुन्हा केला असून त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयात चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला.या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक क्षिरसागर हे करीत आहेत.

या घटनेच्या अनुशंगाने निलंगा येथे जुने पोलीस स्टेशन इमारतीस योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच पो स्टे निलंगा येथील नविन इमारत परिसराला कंमाउंड वॉल असणे आवश्यक असल्याने त्या बाबत संबधील विभागास लेखी पञ व्यवहार करुन कळविण्यात आलेले आहे.

Recent Posts