लातूरच्या खासदारांनी अरविंद पाटील,शैलेश गोजमगुंडे, प्रेरणा होनराव यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज !

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील सिद्धेश्वर मंदीरात उभारण्यात आलेल्या मोठ्या कोवीड केअर सेंटरला भेट देऊन तेथील पाहणी करुन आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला. कोरोना रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवायीक विचारपूस केली. यावेळी कोवीड सेंटर येथील समस्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु असा विश्वास दिला. आरोग्य विभागाकडून कोविड रुग्णाच्या उपचारासंदर्भात माहिती देण्यात आली तर तेथील आवश्यक आरोग्यविषयक यंत्रसामुग्रीची गरज भासली तर तात्काळ कळवून कोवीड रुग्णांच्या उपचाराकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची सूचना केली.

याप्रसंगी सुपर स्पेशालिटी हाँस्पिटललाही भेट देऊन तेथील कोवीड रुग्णांच्या उपचारविषयक अडचणी जाणून घेतल्या. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासंधीची माहिती वेळेवर देऊन उपचारातील प्रगतीबद्दल कळविण्याचेही सूचना दिल्या आहेत यावेळी मनपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे, प्रवक्ता भाजपा, युवा मोर्चा सचिव प्रेरणा होनराव, ओबीसी मोर्चा अध्यक्ष देवा गडदे,श्रीराम कुलकर्णी, किशोर जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीधर पाठक,मनपा सहाय्यक आयुक्त श्रीमती गुरमे,नायब तहसिलदार राजेश जाधव , डॉ.माधव शिंदे,डॉ. धनंजय पडवळ,सहायक अधिष्टाता डॉ शैलेश चव्हाण,डॉ. कलवले व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.अस खासदारांनी आपल्या ट्विटर वरून माहिती दिली.
पण लातूरच्या खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पेक्षा भरीव मदत आणि काम तर प्रवक्ता भाजपा,युवा मोर्चा सचिव प्रेरणा होनराव आणि मनपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे हे करत आहेत अशी चर्चा सध्या चालू आहे.शैलेश गोजमगुंडे यांनी आपल्या प्रभागा क्र.1 मधील कुटुंबाच्या कर्त्या माणसाचा कोरोनाने मृत्यू झाला तर 11,000/ ची मदत आणि प्लाज्मा डोनेट करणाऱ्यानां 500/ रुपये अशी मदत जाहीर केली आहे.

ही मदत खासदारांच्या भेटी पेक्षा जास्त वाटत आहे जनतेला. प्रेरणा होनराव लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. तिकडे निलंग्यात अरविंद पाटील पायात भिंगरी लावल्यासारखे लोकांच्या मदतीसाठी फिरत आहेत. खासदारांनी यांच्या कामापेक्षा तरी जास्त वेळ आणि सेवा केली पाहिजे अशी लातूरकरांची अपेक्षा आहे! आणि चर्चा ही आहे. हे मात्र अस झाल राजा पेक्षा प्रधान मंडळ जनतेच्या कमी येत आहे.

Recent Posts