लातूर जिल्हा

जिह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस दिला जाणार

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हयामध्ये दिनांक 14 मे 2021 रोजी एकूण 12 लसीकरण केंद्र व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर वेळेत येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे. 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र-1) उपजिल्हा रुग्णालय उदगीर, 2)उपजिल्हा रुग्णालय निलंगा, 3)ग्रामीण रुग्णालय अहमदपुर, 4)ग्रामीण रुग्णालय औसा, 5)ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे ऑनस्पॉट कोविशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. 6)ग्रामीण रुग्णालय देवणी दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट,दुसरा डोस कोव्हॅक्शीन ऑनस्पॉट, 7) ग्रामीण रुग्णालय जळकोट दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट 8) ग्रामीण रुग्णालय बाभळगाव दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट, 9)ग्रामीण रुग्णालय मुरुड- दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट,दुसरा डोस कोव्हॅक्शीन ऑनस्पॉट, 10)ग्रामीण रुग्णालय किल्लारी दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट, 11)ग्रामीण रुग्णालय कासारसिरसी दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट,दुसरा डोस कोव्हॅक्शीन ऑनस्पॉट, 12) ग्रामीण रुग्णालय रेणापूर- दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट,दुसरा डोस कोव्हॅक्शीन ऑनस्पॉट, व 13) जिल्हयातील सर्व प्रा.आ.केंद्र व कार्यक्षेत्र येथे दुसरा डोस प्राधान्य, कोविशिल्ड, ऑनस्पॉट,येथे सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत देण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे. 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमीक आरोग्य केंद्र व त्याचे कार्यक्षेत्ररात 45 वर्ष व त्यावरील लाभार्थ्यांसाठी कोवीशील्ड लसीचे प्राधान्याने दुसऱ्या डोसचे लसीकरण उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ. केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 14 मे 2021 रोजी करण्यात येत आहे, ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस कोविशिल्डचाच घ्यावा तर ज्या नागरिकांनी पहिला डोस कोव्हॅक्सीन लसीचा,घेतला असेल त्यांनी दुसरा डोस ही कोव्हॅक्सीन लसीचा घ्यावा असे प्रशासनामार्फत कळविण्यात येत आहे. लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382- 223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

Most Popular

To Top