लातूर LCB आणि रेणापूर पोलिसांची हातभट्टी अड्डयावर संयुक्त कारवाई.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोनाचा संसर्घ रोखण्यासाठी लॉकडाऊन चालू आहे. यामुळे सर्व आस्थापणे बंद आहेत त्यात बार, परमिट रूम, वाईनशॉप हेसर्व बंद असल्यामुळे लातूर जिल्ह्यात हात भट्टी दारू जोमात सुरु होती लातूर पोलिसांची डोकेदुकी ठरलेली ही हातभट्टीचे अड्डे शोधून त्यानां उध्वस्त करणे आणि चालवणाऱ्यावर कारवाई करणे ही मोहीम लातूर पोलिसांनी हातात घेतली आहे. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकुर विद्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे , रेणापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर तालुक्यातील वसंतनगरतांडा येथे अवैधरित्या हातभट्टी दारु तयार करणारे सात व्यक्तींवर LCB लातूर व रेणापुर पोलिस स्टेशन यांच्या पथकाने दि. 25 एप्रिल( वार रविवार ) सकाळी छापेमारी केली.

यामध्ये 8,000 लिटर रसायन व साहित्य असा एकूण किंमत 3 लाख 87 हजार रुपये चे रसायन आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नष्ट करण्यात आले . या कार्यवाहीत सुखदेव खंडू राठोड (रा. वसंतनगर तांडा), रमेश भाऊसाहेब चव्हाण (रा.वमंतनगर तांडा), बालाजी भानुदास चव्हाण
(रा.वमसंतनगर तांडा), विनायक भानुदास चव्हाण (रा.वसंतनगर तांडा), फुलाबाई गणू चव्हाण (रा.वसंतनगर
तांडा), बालाजी सुखदेव राठोड (रा.वसंतनगर तांडा), बाबाराव माणिक पवार (रा.वसंतनगर तांडा), ता. रेणापुर
जि.लातूर अशा एकूण सात आरोपीवर रेणापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Recent Posts