महाराष्ट्र खाकी (जेजुरी) – पुरंदर तालुक्यातील नीरा येथे खून करून अपघात दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार जेजुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये निरा गावाच्या हद्दीत दि. 1/ 4/21 रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी दोन महिला नामे वैशाली संजय काशीद (वय 42 वर्षे) व सुनीता बाळनाथ वाबळे (वय 36 वर्ष) जात होत्या. तशा त्या अनेक दिवसापासून एकत्र मॉर्निंग वॉक जात होत्या त्या दोन महिलांना काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या स्विफ्ट गाडीने जोरदार ठोकर दिली त्या धडकेमुळे त्या दोघी जबर जखमी झाल्या त्या दोघींना बेशुद्ध स्थितीमध्ये लोणंदच्या शिवदे दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. दि. 4/ 1/ 21 रोजी त्यातील महिला वैशाली काशीद हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. महिला नामे सुनीता मोराळे या अद्यापही बेशुद्ध अवस्थेमध्ये लोणंद याठिकाणी शिवदे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अपघात झाल्या नंतर गाडी बंद पडल्याने निरा पुलावर चालक गाडी सोडून पळून गेला. सदर घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी जेजुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 91 /21 कलम 338 ,279 मोटार वाहन कायदा कलम 177 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सदर स्विफ्ट गाडी पंचनामा करून त्यातील भौतिक पुरावे गोळा करून ताब्यात घेण्यात आली. गाडीत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे व भौतिक पुराव्यावरून पोलिसांनी सदर गाडीचा चालक संकेत राजू होले (वय 23 वर्षे) राहणार गोपाळवाडी तालुका दौंड, जिल्हा पुणे असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर सदरचा अपघात हा अपघात नसून घातपात असल्या बाबतचा गोपनीय माहिती पोलिसांकडे आली. त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केला या घटनेमध्ये तांत्रिक पुरावा गोळा करण्यात आले. आरोपी संकेत होले याला तपास कामी ताब्यात घेण्यात आले. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे व्यवस्थित चौकशी केली त्यावेळेस त्याने सांगितले की त्याने हा अपघात जाणूनबुजून केलेला आहे त्याला हा अपघात व खून करण्याबाबत रणजीत सुशांत जेधे राहणार निरा याने सांगितल्याची त्याने सांगितले रणजीत व त्याची गेले चार पाच वर्षापासून ओळख आहे. संकेत होले ज्यावेळेस दौंडच्या गुन्ह्यामध्ये फरारी होता त्यावेळेस तो रणजीत जेधे कडे येऊन राहत होता. त्यामुळे त्यांची मैत्री खूप होती रणजीत सुद्धा त्याच्या हॉटेलवर कुरकुम या ठिकाणी सोलापूर, लातूर या ठिकाणी जाताना थांबत होता. रंजीत जेधे त्याला सांगत होता की महिला नामे सुनीता मोराळे त्यांच्या घरच्यांना खूप त्रास देत आहे. समजूनही सांगत असता ऐकत नाही त्यामुळे घरगुती वातावरण चिंतेत आहे तिचा काटा काढायचा आहे. असे सांगितले सुरुवातीला तो तयार नव्हता परंतु त्याने आरोपी संकेत यास आश्वासन दिले की जर त्याने हे काम केले तर त्याला चांगले हॉटेल काढून देऊन त्याचा सर्व खर्च करू हे आश्वासन मिळाल्यावर तो तयार झाला. त्याने त्याची काल्या रंगाची कार घेऊन निरा या ठिकाणी आला. त्याठिकाणी रंजीत याने त्याची राहण्याची सोय केली सकाळी ज्या वेळेस नेहमीप्रमाणे सुनिता वाबळे त्यांच्या मैत्रिणी सोबत चालण्यासाठी निघाल्या त्यावेळेस रणजीत जेधे याने लाल रंगाच्या कारमधून आरोपी संकेत होले याला सुनिता मोराळे यांना लांबून दाखवले व तो निघून गेला त्यानंतर आरोपी संकेत होले याने सुनिता मोराळे यांना जीवे मारण्यासाठी त्याची काळ्या रंगाची कार त्यांच्या अंगावर घातली परंतु त्यावेळेस चालताना सौ. काशीद या सुद्धा त्या धडकेमध्ये सापडल्या दोघेही बेशुद्ध झाल्या. धडक इतकी जोरात होती की पुढे गेल्यानंतर त्याची कार बंद पडली कार उताराने पुलापर्यंत गेली नंतर आरोपी संकेत हो होले हा त्या ठिकाणावरुन काट्यातून पळून नदीच्या जुन्या पुलावरून विटभट्टी कडे जाऊन पळून गेला नंतर रणजीत बरोबर मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून त्याला बोलून घेतले नंतर रणजित याने त्याला त्याच्या गाडी मधून त्याच्या मूळ गावी दौंड याठिकाणी सोडले अशा पद्धतीने सुनीता मोराळे यांना मारण्याचा कट करण्यात आला व त्यांना धडक देण्यात आली त्यामध्ये सौ. काशीद यांचा मृत्यू झाला व सुनीता मोराळे अद्यापही बेशुद्धावस्थेत उपचार घेत आहेत. रणजीत जेधे व संकेत होले यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यामध्ये किरण सुमंत जेधे यांचा सुद्धा कटात सहभाग असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले. सुनिता मोराळे यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली की सुनिता मोराळे व किरण जेधे यांचे दीड ते दोन वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते व त्या मधून त्या दोघांचे वाद होत होते म्हणून सुनीता मोराळे यांना मारण्याचा कट किरण जेधे यांनी या दोघा आरोपींसोबत केल्याची तक्रार दिलेली आहे. तांत्रिक पुरावा व साक्षीदारांच्या जबान्यावरून किरण जेधे यांना सुद्धा या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे यातील आरोपी रंजीत जेधे याला शोधण्यासाठी लातूर सोलापूर या ठिकाणी टीम पाठविण्यात आली होती, परंतु तो त्या ठिकाणावरुन पसार झाला. संकेत होले व किरण जेधे यांना तीन दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. या गुन्ह्याला कलम 302 307 व 120 ब प्रमाणे कलम वाढ करून गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. सदर खून हा अपघात दाखवून सुनियोजित कट केला तरीसुद्धा पोलिसांनी तो उघड केला.
सदरच्या गुन्ह्याचा तपासात पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे यांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक, सोनवलकर गोतपगार पोलीस हवालदार, मोकाशी कुतवळ पोलीस, नाईक कदम, पोलीस नाईक अक्षय यादव, पोलीस शिपाई शेंडे, महाडिक हे करत आहेत. नीरा पोलीस चौकीचे सर्व अंमलदार यांनीसुद्धा या तपासात मोलाची भूमिका घेतली आहे.