महाराष्ट्र खाकी (लातूर) – कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकार आणि प्रशासन जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन नियमावली जारी करत आहे. पण काही लोक या परिस्तिथीचा फायदा घेऊन लोकांमध्ये वेगवेगळ्या अफवा सोशल मीडियातून पसरवत आहेत. लातूर मधील अशाच दोन घटना आहेत. काही दिवसा पूर्वी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी हे हातात काठी घेऊन दुकान चालकाला मारत आहेत असे काही फोटो समाज माध्यमातून फिरत होते लोकांमध्ये गैरसमज होत होता म्हणून शेवटी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी त्यांच्या ट्विटर वरून आणि फेसबुक पेज वरून ” लातूर चे जिल्हाधिकारी बाजारपेठेत व्यवसायिकांना मारहाण करत असल्याचा चुकीचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. हा मेसेज पूर्णतःचुकीचा असून ते चित्र आपल्या जिल्ह्यातील नाही व सदरील व्यक्ती लातूरचे जिल्हाधिकारी नाहीत.तरी लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.व चुकीची माहिती फॉरवर्ड करू नये.
“असा मेसेज करावा लागला.
लातूर पोलिसांनी पण असाच मेसेज करून लोकांना आवाहन केले आहे. काही दिवसा पासून लातूर मध्ये लॉकडाऊन होणार आहे चालू आहे असे मागील वर्षीचे tv9 मराठीची न्यूज समाज माध्यमातून फिरत होते शेवटी लातूर पोलीस प्रशासनाला जनतेला आवाहन करावे लागेल आहे. लातूर जिल्हा प्रशासन इतके चांगले कोरोना महामारीचे नियोजन करत आहे आणि काही समाजकंटकांनी असे मेसेज पसरवून जनतेत संभ्रमाचे वातावरण करू नये,प्रशासनाला सहकार्यकरावे. विकेंड लॉकडाऊन वेवस्तीत पार पडावा या साठी लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर शहरात बुलेट वरती राउंड मारून लॉकडाऊनचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी पण काही दिवसापूर्वी मेडिकल दुकानदारांना चौकशी करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. इतके चांगले अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत, चांगले काम करत आहेत लोकांना यांची जाणीव पाहिजे असे फेक मेसेज करून यांच्या कमावर पाणी फिरवू नये.