महाराष्ट्र खाकी (उदगीर) – लातूर जिल्हा पोलीस दलाची सूत्र निखिल पिंगळे यांनी हातात घेतल्यापासून गुन्हेगारीत लातूरचा आलेख खाली उतरला आहे. लातूर जिल्ह्याचा चांगला अभ्यास असणारे अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव आणि निखिल पिंगळे यांची जलद गतीने काम करण्याची पद्धत पाहता जिल्ह्यात गुन्हा घडला की तात्काळ सोडवला जातो असाच एक गुन्हा घडला होता.काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी मधून ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरी झाल्याची तक्रार वरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे FIR क्रमांक 47/2021 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे निर्देशाने LCB पोलीस निरीक्षक गजानन भाततवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे व पोलीस ठाणेचे पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास करीत असताना LCB ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोजे,झोला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे राहणारा श्रीहरी सुर्यकांत मुरकुटे,वय 41 वर्ष यास गंगाखेड ते पालम रोड वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने इतर 3 साथीदाराचे साहाय्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे
सांगितले गुन्ह्यात चोरलेला ट्रॅक्टर हेड-ट्रॉली व गुन्हा करते वेळी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केले आहे.तरी पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिम्मत
जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी,उदगीर श्री.डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे
पोलीस निरीक्षक श्री.भातलवंडे,पोलीस निरीक्षक श्री.वाघमारे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.संजय भोसले , पोलीस अमलदार श्री.सिद्धेश्वर जाधव श्री.सुधीर
कोळसुरे,सायबर चे पोलीस अमलदार श्री.राजेश कंचे श्री.प्रदीप स्वामी श्री.रेयाज सौदागर चालक
श्री.नागनाथ जांभळे यांचा सहभाग होता.