लातूर LCB आणि निलंगा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिन चोरट्यांना चोरून नेलेल्या ट्रॅक्टरसह केली अटक

महाराष्ट्र खाकी (निलंगा) – लातूर स्थानिक गुन्हे शाखेचा कारभार पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्याकडे आल्यापासून LCB ची काम करण्याची पद्धत आणि वेग कमालीचा वाढला आहे. एका पाठोपाठ गुन्ह्यांची उकल होताना दिसत आहे. तेही कमी कालावधीत असाच एक गुन्हा पाच दिवसापूर्वी जेवरी तालुका निलंगा येथून चोरलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निलंगा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले असून यातील तीन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. माधव सखाराम तारे वय 65, शेतकरी,राहणार जेजुरी यांनी 4 एप्रिल रोजी निलंगा पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चोरी झाल्याची तक्रार दिलेली होती या आधारे गोपनीय आणि तांत्रिक माहिती मिळवून पोलिसांनी
1 ) अविनाश वसंत पवार वय 24
2 ) सुरज विलास तारे वय 19
3 ) करण आनंद सूर्यवंशी वय 25
हे सर्व तिघे राहणार जेवरी तालुका निलंगा


या व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ट्रॅक्टर चोरून नेल्याचे कबूल केले
त्यांच्याकडून चोरून नेलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉली याचबरोबर गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
हि कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निलंगा चे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे , पोलीस निरीक्षक अनिल चोरमले निलंगा यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड पोलीस अंमलदार सिद्धेश्वर जाधव ,सुधीर कोळसुरे, भिष्मानंद साखरे ,प्रमोद तरडे ,प्रदीप चोपणे , प्रमोद सूर्यवंशी ,सुनील कोवाळे यांनी केली आहे.

Recent Posts