जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी आणि आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या,कोरोना प्रतिबंधाच्या उपाय योजनांबाबत केंद्रीय पथक समाधानी

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अतिशय उत्तमरित्या कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. रुग्णांसाठी केले जाणारे नियोजन समाधानकारक असून कोरोनाबाधितांची संख्येमध्ये वाढ होत असली तरी मृत्यूदर आटोक्यात आणण्यात आरोग्य विभाग चांगले प्रयत्न करीत आहे, असा विश्वास नवी दिल्ली येथील एनसीडीसीचे सहायक संचालक डॉ. तुषार नाळे यांनी आज येथे व्यक्त केला .जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोव्हिड-19 बाबत लातूर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाय योजनाबाबतचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या टीमची बैठक झाली तेव्हा ते बोलत होते. केंद्रीय मल्टीडिसीप्लीनरी पथकात श्री. नाळे यांच्या बरोबर भुवनेश्वर येथील एम्स वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. अलोक साहू यांनी जिल्हयातील कोव्हिड-19 परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगर पालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, विलासराव देशमुख विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख उपस्थित होते.
राज्यातील सध्याची कोविड -19 साथरोग परिस्थितीचा आढावा घेणे तसेच मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय नोडल ऑफिसर व केंद्रीय मल्टी डिसिप्लीनरी पथकाने या आढावा बैठकीत कोविड चाचण्या (RTPCR / RTA), कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग सर्वेलेस आणि कंन्टेनमेंट झोन तसेच कोविड अनुचित दंडात्मक कार्यवाही जिल्हयातील रुग्णालये,बेड्स, रुग्ण्वाहिका, वेंटीलेटर ऑक्सीजन या बाबतची सद्यस्थिती व लसीकरण बाबतची माहिती घेतली.


केंद्रीय पथकाला माहिती देतांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्हयात एकूण कोविड बाधित रुग्ण्संख्या 38 हजार 163 असून त्यापैकी 30 हजार 506 रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला आहे. तर 785 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हयात 6872 रुग्ण कोरोनाबाधित असून मृत्यूदर 2.06 टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 79.94 असून त्यात स्त्री रुग्णाचा प्रमाण 39 टक्के तर पुरुषांचा 61 टक्के आहे. स्त्री रुग्णाचं मृत्येचे प्रमाण 29 टक्के व पुरुष रुग्णांच्या मृत्यूचा प्रमाण 71 टक्के आहे.
50 व त्यापुढील वयाच्या रुग्णांच्या मृत्येचे प्रमाण 84 टक्के असून काँटॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण 17 प्रती रुग्ण तर रुग्ण दुप्पट होण्यास लागणारा कालावधी जिल्हा रुग्णालयानुसार 42 दिवसांचा आहे असे सांगितले . जिल्हयातील कंटेनमेंट झोनची माहिती देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हयात एकूण 9123 कंटेनमेंट झोन आहेत. त्यातील लातूर महानगर पालिका क्षेत्रात 1961 आणि उर्वरित 7162 जिल्हयातील इतर भागात आहेत. सध्या जिल्हयात 528 कंटेनमेंट झोन ॲक्टिव्ह असून 8595 बंद झालेले आहेत.
जिल्हयात आजपर्यंत 3 लाख 27 हजार 885 तपासण्या करण्यात आल्या आहेत.त्यापैकी एकूण 38163 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून पॉझिटिव्हिटीचा दर 11.64 टक्के इतका आहे. जिल्हयातील कॉटेक्ट ट्रेसिंगबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, एकूण 636400 म्हणजे 17 टक्के आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना लातूर जिल्हयासाठी अधिकचा वैद्यकीय मणुष्यबळ, ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध् करुन देण्याची मागणी केली. पथकातील सदस्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.शेवटी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी पथकातील अधिकाऱ्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.

Recent Posts