महाराष्ट्र खाकी (कासारशिरशी / विवेक जगताप ) – कासार शिरशी पोलिसांची कर्तव्यदक्षतेच्या पुढे जाऊन जन सेवा अतिवृष्टी व नुकसानीची पाहणीसाठी आलेल्या कासारशिरसी पोलिसांनी जेवरीच्या पुलावरील धोकादायक खड्डा दगड टाकून बुजवून होणारा धोका टाळला. कासारशिरसी पोलिसांच्या या कार्याचे राज्यात कौतुक होत आहे. सांगवी, जेवरी व बामणी ही गावे परवाच निलंगा पोलीस स्टेशनमधून काढून कासारशिरसी
पोलीस स्टेशनला जोडण्यात आली आहेत. नवीन जोडण्यात आलेल्या गावात अतिवृष्टीच्या पावसाचा आढावा घेण्यासाठी व नागरिकांच्या समस्यांचा वेध घेण्यासाठी कासार शिरसी पोलीस या भागात दि. 28 सप्टेंबर रोजी आले होते. अतिवृष्टीमुळे जेवरी व बामणी रोडवरील पूल वाहून गेला व रस्त्यात मोठा खड्डा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. या
परिस्थितीची गंभीरता ओळखून कासार शिरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, श्रीहरी डावरगावे, आबासाहेब इंगळे, सुरज माने, होमगार्ड बनसोडे व पांडे यांनी विलंब न लावता आपल्या कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डा बुजविण्याचे काम केले. पावसामुळे प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतः दगड उचलून रस्ता बुजवून त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरळीत केली. या कार्यामुळे कासारशिरसी पोलीसांचे राज्यभरत कौतुक होत आहे.
