मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणजे वैचारिक निर्णयक्षमता, गोरगरिबांचे कैवारी, कर्तृत्वाची खंबीर साथ देणारे युवकांचे स्फूर्तीस्थान

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – वैचारिक निर्णयक्षमता,  गोरगरिबांचे  कैवारी,  कर्तृत्वाची  खंबीर  साथ म्हणून  ओळखले  जाणारे  युवकांचे  स्फूर्तीस्थान  आणी राजकारणात  येऊ  इच्छिनाऱ्या  नव्या  युवकसाठी  आदर्श राजकारणी  लातूरचे  माजी  महापौर  विक्रांत  गोजमगुंडे  हे विकासाने  झपाटलेले  नेतृत्व  तरुणांमध्ये  आदर्शवत  आहे. माजी  मुख्यमंत्री  विलासराव  देशमुख,  माजी  मंत्री  अमित देशमुख,  माजी  मंत्री  दिलीपराव

देशमुख, माजी नगराध्यक्ष  विक्रम  गोजमगुंडे  यांची समाजकारणासह  राजकारणात  युवकांना लाजवेल अशीच वाटचाल राहिली आहे. त्यांच्याच विचारांची शिदोरी घेऊन समाजकारणासह  राजकारणात   ठसा  उमटविणारे विक्रांत गोजमगुंडे  यांचा आज सोमवार (दि.31) वाढदिवस आहे. जागतिक  क्रांतीमध्ये  तरुणांचा सहभाग  महत्वाचा ठरला आहे. तरुणांच्या पाठबळावरच  देश  प्रगतीपथावर  गेल्याचा इतिहास

आहे. हाच इतिहास  डोळ्यासमोर ठेवून  मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी  समाजकारणाबरोबरच लातूर शहरासह जिल्ह्याच्या  राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील युवक फळीसाठी ते स्फूर्तीस्थान बनले आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी अद्वितीय कर्तृत्वाने सहकार, शैक्षणिक,

राजकीय क्षेत्रातील कामगिरीद्वारे लातूरसह जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. जनतेचा उद्धार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री  दिलीपराव देशमुख माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांची मोलाची साथ लाभली. वडिलांसह या ज्येष्ठ नेत्यांचा विकासाचा वारसा माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे पुढे चालवत आहेत. विक्रांत गोजमगुंडे हे महापौर

असताना त्यांनी लातूरच्या विकासात भर पडली आणी सामान्य जनतेचे प्रश्नसोडवून तसेच या माध्यमातन शेकडो तरूणांना रोजगाराकडे वळवण्याचे काम त्यांनी केले आहे. महापौर कार्यकाळात लातूर महापालिकेला स्वच्छतेत देशातील मोठा पुरस्कार मिळवून दिला, महिला साठी मोफत सिटीबस योजना सुरुकरून लातूरला देशात पहिला मान मिळवून दिला आणी याच उपक्रमाची दखल घेऊन राज्य सरकारने हा उपक्रम

राज्य भरातील महिला साठी अर्धेतिकीट योजना चालू केली. तसेच आपल्या कर्तृत्वाने, लोकसेवेची परंपरा आणी विविध माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम ते करीतआहेत. गोजमगुंडे परिवाराने शैक्षणिक क्षेत्रात विवि धसंस्था काढून गोरगरीब मुलामुलींना शिक्षणाची सोय केली आहे. देशाचा कणा मजबूत असेल तरच देश प्रगती करू शकेल हा विचार मनाशी बाळगून आज ही गोजमगुंडे परिवार आणी मा. महापौर विक्रांत

गोजमगुंडे हे लातूरच्या विकासासाठी, युवकांसाठी आणी जनतेसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. लातूरच्या राजकारणात सक्रिय असणारे विक्रांत गोजमगुंडे आजही युवकांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी तेवढेच गंभीर आणि सक्रिय असतात. त्यामुळे अशा कार्यकर्तृत्वान, विकासाभिमुख आणि युवकांचे स्फूर्तीस्थान असलेल्या लातूर शहर मनपाचे माजी यशस्वी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना खाकी फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी आणी लातूरचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.