माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांचे केले मनःपूर्वक अभिनंदन

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप )  – विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 48 उमदेवाराची पहिली यादी असून स्व.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांना तिकीट

देण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता माजी मंत्री  अमित विलासराव देशमुख यांना लातूर शहर मतदारसंघातून चौथ्यांदा आणि धीरज विलासराव देशमुख यांना दुसऱ्यांदा लातूर ग्रामीण मतदारसंघातून भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली आहे. याबद्दल लातूर माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन केले आहे. विक्रांत गोजमगुंडे हे लातूर मधील काँग्रेसचे असे नेते आहेत त्यांनी आपल्या महापौर पदाच्या कार्यकाळात आपल्या कार्यातून लातूरकरांच्या मनावर राज्य केले आहे. लातूरच्या जनतेने डोक्यावर घेतलेल्या नेत्या पैकी एक आहेत विक्रांत गोजमगुंडे यांनी देशमुख

बंधुचे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.आणि आपल्या प्रभावशाली रजकारणाच्या आणि समाजकारणाच्या माध्यमातून जनतेने पुन्हा एकदा देशमुख बंधूना मतदान करण्यासाठी आवाहन करताना दिसतील माजी महापौर विक्रांत गोजमागुंडे, लातूर मधील OBC आणि विशेषतः यालम (रेड्डी ) समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत.