मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांच्या डोक्यात अल नाही ते आमदार अभिमन्यू पवार यांच्या डोक्यात अल !

महाराष्ट्र खाकी ( मुबंई / विवेक जगताप ) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि जवळचे म्हणून ओळख असलेले औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे आमदार झाल्यापासून औसा मतदार संघाचा विकास तर केलाच आहे. या सोबतच लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांना आणि मंत्र्यांना भेटत असतात, आता तर आमदार अभिमन्यू पवार यांनी

मराठवाड्यासाठी अशी मागणी केली आहे, ती मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांच्या डोक्यात आली नाही. प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित असावा अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर

मुनगंटीवार यांची भेट घेऊन केली आहे . सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढा द्यावा लागला, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दैदिप्यमान इतिहास पुढच्या पिढ्यांना ज्या पद्धतीने शिकवला जायला हवा होता त्या पद्धतीने शिकवला गेला नाही. त्यामुळे प्रजासत्ताक

दिनानिमित्त 26 जानेवारी, 2023 रोजी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित असावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे . चित्ररथ संकल्पना ठरवण्याचे काम अंतिम टप्यात असले तरी यासंदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून विशेष बाब म्हणून या वर्षी किंवा पुढच्या वर्षी मराठवाडा

मुक्तिसंग्रामावर आधारित चित्ररथ समाविष्ट करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार अभिमन्यू पवार यांना दिले आहे.