सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विवीध धार्मिक स्थळी प्रार्थना

महाराष्ट्र खाकी ( परळी ) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने मराठवाड्याचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई येथे ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चालू असलेल्या उपचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना निरोगी आरोग्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना प्रभु वैद्यनाथांना

करण्यात आली. दि.14 रोजी देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगास रुद्राभिषेक करण्यात आला..तसेच अंबाआरोग्य भवानी डोंगरतुकाईची पुजा व दर्ग्यांना चादर चढवून प्रार्थना करण्यात आली. तसेच शहरातील उमर शहावली दर्गा,मलिकपुरा दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,जिल्हा

सरचिटणीस बाळासाहेब देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक,जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी,माजी नगरसेवक जयपाल लाहोटी, वैजनाथ बागवाले, नगरसेवक राजेंद्र सोनी,चेतन सौंदळे,अनिल आष्टेकर,जयराज देशमुख, जयप्रकाश लड्डा,रमेश भोयटे, राधाकृष्ण साबळे,जालिंदर नाईकवाडे, सुरेंद्र कावरे,

के.डी. उपाडे, डी.जी मस्के, अॅड. मनजीत सुगरे,अड.सुरेश शिरसाठ,मुन्ना बागवाले,सुरेश नानवटे, जितेंद्र नव्हाडे,शरद कावरे,कमल किशोर सारडा, राजीव तीळकरी,रमेशराव मुंडलीक, अशोकराव डहाळे, रमेशराव डहाळे,अमोल डहाळे, संदीप टेहरे,मुन्ना बाहेती, संतोष टाक,वसंतराव उदार,व्ही.एस. शेप, आनिकेत तिळकरी , विष्णू साखरे,महिला आघडीच्या चित्राताई देशपांडे,

उमाताई धुमाळ, वर्षाताई दहिफळे, शिल्पाताई मुंडे
माजी उपनराध्यक्षअय्युब पठाण, नगरसेवक अझीझ कच्छी, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सय्यद
सिराज,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष नाझेर हुसैन,हाजी बाबू, तक्की खान,सेवादल अध्यक्ष लालाभाई पठाण,युनूस डीघोळकर, राजुभाई ,मोईन काकर,शेख नयुम,सलीम पटेल,रझा खानआदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.