लोकसेवेचा विश्वास, कार्याचा सन्मान; ऍड. वैशाली लोंढे-यादव यांना भाजपची उमेदवारी म्हणजे आर्वी–महापूरचा विजय निश्चित

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – आरोग्य, शिक्षण किंवा सामाजिक कोणत्याही क्षेत्रात मदतीसाठी ज्यांच्याकडे मागणी केली आणि ती अपूर्ण राहिली नाही, अशी विश्वासार्ह प्रतिमा असलेल्या ऍड. वैशाली लोंढे-यादव यांना भारतीय जनता पार्टीने लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आर्वी–महापूर सर्कलमधून उमेदवारी देऊन त्यांच्या लोकसेवेच्या कार्याचा आणि जनभावनेचा सन्मान केला आहे, अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो वा आरोग्याच्या आपत्कालीन प्रसंगी रक्तपुरवठा, उपचार, लग्नातील मदत किंवा इतर कोणतेही सहकार्य—ऍड. वैशाली लोंढे-यादव यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी अनेक कुटुंबांना / रुग्णांना ऑक्सिजन, बेड, किराणा किट उपलब्ध करून दिले, तर शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांना जुने-नवे मोबाईल देत समाजकार्याचा आदर्श निर्माण केला.

कोणतेही पद नसताना, केवळ एक सामान्य नागरिक म्हणून सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून त्यांनी जे कार्य केले, तेच त्यांच्या लोकप्रियतेचे खरे कारण आहे. त्यामुळेच “जर त्या जिल्हा परिषदेत निवडून गेल्या, तर लोकसेवा अधिक ताकदीने आणि व्यापक प्रमाणात होईल,” असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीसह आर्वी–महापूर सर्कलमधील जनतेत व्यक्त होत आहे.

ऍड. वैशाली लोंढे-यादव यांना दिलेली उमेदवारी म्हणजे केवळ राजकीय निर्णय नसून, लोकांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब करणारा निर्णय असल्याची भावना आज सर्वत्र ऐकू येत आहे.