BJP लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली देवाभाऊ महाआरोग्य शिबीराचे आयोजन

महाराष्ट्र खाकी ( प्रतिनिधी / लातूर ) – भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्ह्याच्या पुढाकारातून व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, वि.दे.शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, विवेकांनद वै.प्रतिष्ठान व संशोधन केंद्र लातूर, लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा युवा नेते तथा भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अजित

पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली देवाभाऊ महाआरोग्य शिबीराचे आयोजन 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 09. ते दुपारी 04 या वेळेत महाराष्ट्र विद्यालय मैदान, मजगे नगर, लातूर येथे करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या  संकल्पनेतून राज्यभरासह लातूर शहरामध्ये ठेवण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबीरामध्ये नेत्रतपासणी, स्त्रिरोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, त्वचा रोग तपासणी,

बालरोग, अस्थिरोग, मेंदू व मनका विकार, हृदय रोग यासह इतर सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. याबरोबरच या शिबिरामध्ये तपासणी झालेल्या शिबीरार्थ्यांना आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व आभा हेल्थ कार्ड तयार करून देण्यात येणार आहे.त्यामुळे लातूर शहरातील महाराष्ट्र विद्यालय, मैदान मजगे नगर येथे आयोजित देवाभाऊ  महाआरोग्य शिबीरात प्रभाग 6 व 18 मधील नागरिकांनी

उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲड.गणेश गोजमगुंडे व भाजपा पंचायतराज ग्रामविकास शहरचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार यांनी केले आहे.याबाबत अधिक माहितीसाठी 8767941194,   8805734493,9860725916, 9527352318 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आलेले आहे.