डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला अनुपस्थित राहणाऱ्या पुढाऱ्यांचा समाजाने बहिष्कार करावा – माजी खा. डॉ. सुनील गायकवाड

महाराष्ट्र खाकी (निलंगा / प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त निलंगा येथे आयोजित  संविधान  सन्मान सभा  कार्यक्रमात माजी खासदार डॉ. सुनील बळीराम  गायकवाड यांनी ज्वलंत  वक्तव्य करत सामाजिक  आणि राजकीय  चर्चेला सुरुवात  केली आहे. ते म्हणाले, “प्रत्येक  वर्षी बाबासाहेब  आंबेडकर यांची  जयंती मोठ्या  उत्साहात  साजरी केली  जाते. मात्र काही  राजकीय नेते, ज्यांना  निमंत्रण

देऊनही  उपस्थित राहावंसं   वाटत नाही, ते  केवळ मतांसाठी बाबासाहेबांचं  नाव घेतात. हे दुहेरी  वर्तन असून, अशा लोकांना समाजाने  बहिष्कृत केलं पाहिजे.” डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, “बाबासाहेबांचे विचार, संघर्ष आणि  संविधानाचे योगदान ही फक्त घोषणांपुरती  मर्यादित असू नयेत. ज्या नेत्यांनी बाबासाहेबांचा आदर फक्त  निवडणुकीपुरता राखला आहे, त्यांनी समाजातील श्रद्धा आणि इतिहासाशी खेळण्याचा

अधिकार नाही.” कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. डॉ. गायकवाड यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांचे कार्य केवळ स्मरण करण्यासाठी नव्हे तर आचरणात आणण्याचे आवाहन केले. त्यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.मोठ्या संख्येनी लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय

संविधानाचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर, उद्घाटक माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी जि प अध्यक्ष पंडित धुमाळ, माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख,पंकज शेळके, लिंबन महाराज रेशमे, मंजुताई निंबाळकर, भंते सुमेध नागसेन, भिक्कू संघ, एड.जगदीश सूर्यवंशी,प्रा. किशोर चक्रे, अनेक मान्यवर उपस्थित होते.

Recent Posts