Ritesh Deshmukh अभिनेते रितेश देशमुख यांनी काका दिलीपराव देशमुखांना पोस्ट करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) –तुम्ही आमच्या सर्वांसाठी शक्तीचा आधारस्तंभ आहात . तुम्ही आमच्या आयुष्यात आहात, हे आमचं भाग्य. तुम्हाला चांगलं आरोग्य, आनंद आणि दीर्घ, परिपूर्ण आयुष्य मिळो हीच शुभेच्छा.आम्ही तुमच्यावर प्रेम करतो म्हणत अभीनेते रितेश देशमुख यांनी आपल्या काकांना म्हणजे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या

सोशल मीडिया अकाउंटवरून त्याचे वडिल दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रति आणी परिवाराच्या आठवणी शेअर करत असतात . रितेश देशमुख  आपल्या वडिलांवर आणी परिवारावर असलेल प्रेम हे त्याच्या पोस्ट आणी व्हिडिओं मधून दिसून येते. विलासराव यांच्या निधानंतर देशमुख कुटुबांचा आधार गेला. पण या काळात त्यांच्या कुटुंबावर मायेचं पांघरुण घातलं ते त्यांचे काका म्हणजेच विलासराव यांचे धाकटे बंधू

दिलीपराव देशमुख यांनी. त्यांनी कधीही मुलांना वडिलांच्या निधानानंतर पोरकेपणा भासू दिला नाही. त्यामुळे दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल विलासराव देशमुख यांच्या मुलांमध्ये आपुलीची भावना आहे. दिलीपराव देशमुख यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने रितेश देशमुख यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी काकांना म्हणजेच दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिय

काका 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या मार्गदर्शनासाठी, प्रेमासाठी आणि अढळ पाठिंब्यासाठी आम्ही नेहमीच आभारी आहोत. तुम्ही आमच्या सर्वांसाठी शक्तीचा आधारस्तंभ आहात . तुम्ही आमच्या आयुष्यात आहात, हे आमचं भाग्य. तुम्हाला चांगलं आरोग्य, आनंद आणि दीर्घ, परिपूर्ण आयुष्य मिळो हीच शुभेच्छा.आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. असं रितेश देशमुख यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Recent Posts