मा.खासदार डॉ सुनील गायकवाड यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा कडून वकिलीची सनद प्रदान

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर लोकसभेचे संसदरत्न  माजी  खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट सुनील बळीराम गायकवाड यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या कडून वकिलीची सदन, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल चे सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांच्या लातूर येथील कार्यालयाच्या परिवर्तन सभागृहात त्यांच्या आणि प्रसिद्ध वकील अॅड.व्यंकट बेद्रे, अॅड उदय गवारे यांच्या हस्ते वकिलीची सनद वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ सुनील

बळीराम गायकवाड हे प्रथम लॉ मेकर आणि नंतर वकील असा त्यांचा प्रवास आहे. देशाच्या सुप्रीम कोर्टात ते वकिलीची प्रैक्टिस करत आहेत. कायदा बनवणाऱ्या सभागृहात काम करून आता वकिलीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट येथे वकिली करीत आहेत त्यांच्या नवीन नोबल व्यवसायाला या कार्यक्रमात सर्वांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या सतत शिक्षण घेत असलेल्या स्वभावाचं सर्वांनी कौतुक केले. आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात नवीन वकील झालेल्या वकिलांना वकिलीची सनद बार कौन्सिल ऑफ

महाराष्ट्र अँड गोवा कडून सन्मान पूर्वक कार्यक्रमात देण्यात आले. कार्यक्रमात प्रसिद्ध वकील उदय गावरे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया चे वकील डॉ सुनील बळीराम गायकवाड,प्रसिद्ध वकील व्यंकट बेद्रे, आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे सदस्य प्रसिद्ध वकील अण्णाराव पाटील यांनी नवोदित वकिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नवोदित वकील महिला आणि पुरुष यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Recent Posts